कोकणात रेल्वे सोडण्याबाबतचं घोडं अडलंय तरी कुठं? रेल्वे प्रवासी संघटना राज ठाकरेंना भेटणार

कोकणात रेल्वे सोडण्याबाबतचं घोडं अडलंय तरी कुठं? रेल्वे प्रवासी संघटना राज ठाकरेंना भेटणार

मुंबई : मध्य रेल्वेने रेल्वे मंत्रालयाकडे कोकणात दरवर्षी गौरी गणपती उत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष ट्रेनचे नियोजन पाठवले होते. मात्र, रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली असून, राज्य शासनाकडे कोव्हिड 19 रोग्यप्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याचा दावा मध्य रेल्वेने केल्याने, गणपती उत्सवासाठी अद्याप कोकणात रेल्वेची सुविधा सुरू करण्यात आली नाही.  त्यामुळे कोकणातील सर्व प्रवासी संघटना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची 15 ऑगष्ट रोजी भेट घेणार असल्याचे वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेने सांगितले आहे.

कोकणात गणेशोत्सवाला जाण्यासाठी विशेष रेल्वे गाडयांसाठी सतत पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकारने कोकणात ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. मध्य रेल्वेने 208 फेर्‍या चालविण्याचा प्रस्ताव सुध्दा अंतिम मंजूरीसाठी रेल्वे बॉर्डाकडे पाठविण्यात आलेल्या होता. मात्र, कोकणात गणपती उत्सवासाठी रेल्वे चालवण्यावर अद्याप संभ्रम असून, रेल्वे मंत्रालयाने कोकणातील गणपती उत्सवाच्या रेल्वे सोडण्याचा मान्यता दिल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. मात्र राज्य सरकार कोव्हिड19 च्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत असल्याचे सांगून, अद्याप रेल्वेने कोकणासाठी कोणतीही सुविधा सुरू केली नसल्याचे ही रेल्वेकडून सांगितल्या जात आहे.

मात्र, कोकणात गणपती उत्सवासाठी सोडण्यात येणाऱ्या रेल्वे सेवेवरून सुरू असलेल्या राजकारणामुळे कोकणातील प्रवासी संघटनांमध्ये प्रचंड नाराजी आहे. किमान मुंबईचा परतीचा प्रवास तरी कोकण रेल्वेने व्हावा अशी मागणी कोकण रेल्वे प्रवासी संघटना करत असून, त्यासाठी आता रेल्वे प्रवासी संघ मनसेप्रमुख राज ठाकरे यांची 15 ऑगस्ट  रोजी भेट घेऊन आपल्या समस्या माडणार आहे. 

विरोधी पक्षनेत्यांकडे धाव
राज्य सरकार कोकणातील नागरिकांच्या मागणीकडे लक्ष देत नसल्याने अखेर कोकणातील सर्व प्रवासी संघटना एकवटल्या असून, आता, राज ठाकरे यांच्याशिवाय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेऊन आपल्या समस्या मांडण्यात येणार असल्याचे वसई सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव यशवंत जडयार यांनी सांगितले आहे.

राज्यातील भूमिपुत्र वार्‍यांवर 
लॉकडाऊनच्या काळात राज्यसरकारने उत्तरभारतीयांना रेल्वेने मोफत त्यांच्या गावी सोडून दिले आहे. मात्र कोकणातील मानाचा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांना गावी पाठवण्यात राज्य आणि केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. वेळोवेळी राज्य आणि केंद्राकडे, रेल्वे विभागाकडे गणेशोत्सवासाठी रेल्वेची सुविधा सुरू करण्याची मागणी केल्यानंतरही रेल्वे सुविधा मिळत नसल्याने कोकणातील चाकरमान्यांनी सरकारचा या धोरणाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे.

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com