महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाला समकक्ष यंत्रणा उभारणार?

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 5 November 2019

  • सेनेला आता हवी सुकाणू समिती
  • समितीआडून सेनेला हवंय सत्तेवर नियंत्रण

मुख्यमंत्रीपदाबाबत कोणतीही तडजोड नाही, अशी स्पष्ट भूमिका भाजपने घेतलीय. त्यामुळे एका नव्या पर्यायाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेने भाजपकडे एक सुकाणू समिती गठीत करण्याचा प्रस्ताव दिलाय. ही सुकाणू समिती राज्य सरकारच्या निर्णय प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणार असून या समितीचे अध्यक्षपद सलग पाच वर्षे उद्धव ठाकरेंकडे असावे, असा हा प्रस्ताव आहे..

आता बास, 48 तासानंतर शिवसेना अॅक्टीव्हेट करणार आपला प्लान 'B'

यापुर्वी युपीएच्या काळात केंद्रात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली अशीच एक उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. त्याच धर्तीवरच्या राज्यातल्या सुकाणू समितीत भाजप-शिवसेना आणि मित्रपक्षांचे ज्येष्ठ सदस्य असतील. राज्यासमोरील एखादा महत्वाचा प्रश्न किंवा एखादा महत्वाचा निर्णय मंत्रिमंडळात चर्चेला येण्यापुर्वी या समितीकडे चर्चेला येईल आणि या समितीच्या मंजुरीनंतरच मंत्रिमंडळासमोर तो आणला जाईल, अशा स्वरूपाची तरतूद करण्यात यावी. तसंच या समितीला घटनात्मक दर्जा असावा अशीही शिवसेनेची मागणी आहे

भारतात 'या' शहरातील तरुण सर्वात आधी गमावतात आपली व्हर्जिनिटी..

सध्याची शिवसेनेची ताठर भूमिका पाहता अशा प्रकारची सुकाणू समिती स्थापन करण्यास भाजपने संमती दिल्यास मुख्यमंत्रीपद न मिळताही शिवसेनेच्या कुटनीतीचा विजय झाल्याचं चित्र निर्माण होईल. शिवाय या समितीच्या माध्यमातून सत्तेचा रिमोट कंट्रोलही आपसूकच आपल्या हाती राहील, अशी शिवसेनेची रणनिती आहे. आता फक्त पाहायचं एवढंच, की सध्या निर्माण झालेला सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी भाजप हा पर्याय स्विकारणार का?

WebTitle : will shivena demand for equivalent mechanism to CM post

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will shivena demand for equivalent mechanism to CM post