
विधानपरिषदेचं आजच्या दिवसाचं कामकाज स्थगित
राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार आहे. त्याआधी महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला सुरुवात झाली. अधिवेशन सुरू होण्याआधी पक्षांच्या अंतर्गत बैठकी देखील होण्याची शक्यता आहे. (Assembly Winter session)
या अधिवेशनात राज्यातील गुन्हे, महिला सुरक्षा प्रश्नावर सत्ताधाऱ्यांना विरोधक घेतण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर दुसरीकडे शक्ती कायद्याबाबत (Shakti Law) महत्वाची चर्चा ही होणार आहे. याशिवाय शिवाजी महाराज पुतळा विटंबना प्रकरणात सत्ताधारी भाजपला जाब विचारू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिलीय. यासंदर्भात गृहमंत्र्यांनीही माहिती दिली आहे. (Dilip Walse)
शोक प्रस्तावानंतर संध्याकाळी चार वाजता विधानपरिषदेचं आजचं कामकाम स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा सभापती रामराजे निंबाळकर यांनी केली. त्यानंतर उद्या गुरुवारी सकाळी १० वाजता सभागृहाची विशेष बैठक होईल. दरम्यान, १० ते ११.४५ पर्यंत लक्षवेधी सूचना घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सभागृहाची नियमित बैठक गुरुवारी दुपारी बारा वाजता पुन्हा सुरु होईल.
नाना पटोले विरुद्ध नितीन राऊत -
ज्यांनी सौर पंप लावलेत त्यांना दिवसाही वीज उपलब्ध होणार आहे. २०१७ ते २०१९ आपले सरकार नव्हते. त्यावेळी त्या सरकारने वीज बिल वसुली केली नाही. मागील अनेक वर्ष शेतकरी वीज बिल वसुली करण्यात आली नव्हती. हे काम आम्हाला करावे लागणार आहे. वीज विकत घ्यावी लागते. २०१४ ला १७ हजार कोटी वीज बिल थकबाकी होती, ती २०१९ पर्यंत ५६ हजार कोटींवर गेली. त्यानंतर नाना पटोलेंनी कृषी पंपाला कमीत कमी १२ तास वीज द्या अशी मागणी केली. तसेच सर्व बील माफ करण्याची मागणी केली.
...तर मी माफी मागतो!
भास्कर जाधव यांनी नरेंद्र मोदी यांचा अंगविक्षेप केल्याचा आरोप फडवीस यांनी केला. यानंतर विरोधकांनी त्यांच्या माफीची मागणी केली. अखेर भास्कर जाधव यांनी माफी मागितली आहे. सभागृहाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी माफी मागतो, असं ते म्हणाले.
माझी बोलत असताना माझे हातवारे होतात हलन होत
बोलण्याच्या ओघात माननीय पंतप्रधान यांची नक्कल केली असा आरोप केला
कामकाज सुरळीत चालायचे असेल भावना दुखावल्या असतील तर मी बिनशर्त माफी मागतो
ओबीसींचा प्रश्न मार्गी लागणार?
ओबीसी आयोगाला ४३० कोटींचा निधी मंजूर
या आधी सरकारने ५ कोटी मंजूर केले होते आता ४३५ कोटी रूपये देण्याचे प्रस्तावित केले
ओबीसी आयोगाने निधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करत पत्र पाठवले होते
इंपीरिकिल डेटा गोळा करण्यासाठी आयोगाला निधी, पुरवणी मागण्यात निधी
भास्कर जाधव यांनी माफी मागावी या मुद्द्यावरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानंतर सभागृहाचे कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
मुनगंटीवार यांनी म्हटलं की, विधानसभा लोकशाहीचा फड आहे. हा तमाशाचा फड करणाऱ्यांना आज ठेचलं नाही तर उद्या लोकशाहीचं पवित्र मंदिर अडचणीत येईल.
संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी सांगितलं की, भास्कर जाधवांनी त्यांचे अंगविक्षेप आणि शब्द मागे घेतलेत. आता तुम्ही समज द्या अशी अध्यक्षांकडे विनंती केली.
विरोधी पक्षनेते फडणवीस म्हणाले की, अंगविक्षेप मागे घेतो म्हणतायत. ते गमतीने घेतायत. त्यांना वाटतं की आम्हाला समजत नाही, अंगविक्षेप कसे मागे घेणार, सभागृहात त्यांनी मान्य केलं आहे तर माफी मागावी.
विरोधी पक्षाने घेतलेल्या आक्षेपावर उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले की, विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की भास्कररावांनी जे काही अंगविक्षेप केले, पंतप्रधानांबद्दल बोलले ते योग्य नाही, ते तपासून बघतो असं अध्यक्ष म्हणाले, सभागृह स्थगित करा अशी विरोधकांची मागणी, पण हे सगळं करण्यापेक्षा मी माझे अंगविक्षेप आणि शब्द मागे घेतो.
मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर नव्हे तर पंतप्रधान होण्याआधी वक्तव्य केलं होतं. त्यावरून विरोधक शब्दछल करत असल्याचं भास्कर जाधव यांनी म्हटलं. तसंच पंतप्रधानांची नव्हे तर उमेदवाराची नक्कल केली असं उत्तर भास्कर जाधव यांनी दिलं.
अंगविक्षेप करून पंतप्रधानांबद्दल बोलणं सहन केलं जाणार नाही. माफी मागितली पाहिजे यावर फडणवीसांनी आक्रमक पवित्रा घेतला. देशाच्या पंतप्रधानांबद्दल चुकीचं वक्तव्य खपवून घेणार नाही, माफी मागा, हे चालू देणार नाही अंस म्हणत फडणवीस आक्रमक झाले. तसंच भास्कर जाधव यांनी केलेली नक्कल हे वाईट आहे. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी विरोधकांनी केली. सभागृहात नसलेल्यांबद्दल चुकीचं वक्तव्य करता येणरा नाही. मी खुलं आव्हान देतो. मोदींनी असं म्हटल्याचा एक तरी पुरावा दाखवा, माफी मागा नाहीतर हे चालू देणार नाही. हे चालणार नाही. हे पहिले काढून टाका अशी मागणी फडणवीस यांनी केली.
भास्कर जाधव म्हणाले...
मी पंतप्रधानांवरील अंगविक्षेप मागे घेतो. मात्र, याव्यतिरिक्त जास्त मी काहीही करू शकत नाही. मी माफी मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सभागृहाचं कामगाज वेळेत चालावं यासाठी मी शब्द मागे घेतो. सभागृहाच्या रेकॉर्ड्स वरून ते काढून टाकावे, असं जाधव म्हणाले.
राजेश टोपे
- जी ऑडिओ क्लिप आली आहे त्याची सायबर क्राईम चौकशी सुरू आहे..
याची पाळेमुळे खोदून काढुया, दोषींवर कारवाई करूया..
- आरोग्य विभागाने स्वतःहून FRI दाखल केलेला आहे
गोपीचंद पडळकर
- न्यासा कंपन्यांचा दलालाचा ऑडिओ सोशल मीडियावर फिरला..
- याची चौकशी केली का?
- अमरावती मध्ये 200 लोकांनी पैसे दिले याची माहिती आहेत का?
- अधिकारी यांची चौकशी सुरू झाले धागेदोरे कुठपर्यंत आहेत याची काय माहिती आहे
राजेश टोपे-
- मुलांवर अन्याय होऊ नयेत
- कुंपणच शेत खात अशी पद्धत बदलण्याची गरज आहे.
- जनतेच्या हितासाठी जागा भरण्याचा हेतू आहे.
- जे दोषी आढळले आहेत पोलीस त्यांच्यावर कारवाई करतील..
- मुख्यमंत्री यांनी ही दोषींवर कारवाई करणाऱ्यांना पाठीशी न घालण्याचे सांगितले आहे
भरतीच्या मुद्द्यावर चर्चा झालीच पाहिजे, वेळ नेमून द्या - फडणवीस
न्यासाला काम का दिलं? इतर कंपन्या नव्हत्या का? फडणवीस
या सरकारच्या काळात एकही परीक्षा घोटाळ्याशिवाय झाली नाही - फडणवीस
न्यासा सोडून दुसरी कंपनी नव्हती का? फडणवीसांचा सवाल
अजित पवार यांनी आरोग्य भरती घोटाळा प्रकरणी चर्चा करण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना तत्काळ सभापतींच्या दालनात बोलावले
विम्याचे पैसे विमा कंपन्यांच्या खिशात गेले आहेत. शेतकऱ्यांना फायदा नाही - फडणवीस
चिपळूण शहरातील खाडीत जो गाळ साचला त्याची उपसा करण्याची विना रॉयल्टी परवानगी मिळेल का? - भास्कर जाधव
इतिहासात पहिल्यांदा असं घडलं की मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे - सुधीर मुनगंटीवार
विरोधक बाहेर गेल्यानंतर उपमुख्यमंत्री सभापतींच्या दालनात दाखल
महसूल मंत्र्यांनी उत्तर देताना या संपूर्ण प्रकरणाचा पुन्हा पंचनामा घेणार असल्याचं सांगितलं. winter assembly session
अतिवृष्टीमुळे पंचनाम्यात वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना काय मदत मिळणार?
देवेंद्र फडणवीसांचा अधिवेशाच्या प्रक्रियेवर आक्षेप
विरोधकांनी एकत्र येत सरकारविरोदात घोषणाबाजी केली आहे.
हिवाळी अधिवेशनाआधी विरोधीपक्षांचा पायऱ्यांवर ठिय्या
महाविकास आघाडीचे मंत्री विधीमंडळाच्या आवारातील शिवरायांच्या दर्शनाला
हिवाळी अधिवेशाआधी महाविकास आघाडी सरकाच्या आमदारांची बैठक पार पडली.