सेलिब्रिटींच्या लसीकरणावरुन आदित्य ठाकरेंवर मोठा आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aditya Thackeray

सेलिब्रिटींच्या लसीकरणावरुन आदित्य ठाकरेंवर मोठा आरोप

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: आदित्य ठाकरेंच्या (Aaditya thackeray) मदतीमुळे सेलिब्रिटींना कुठल्याही अडथळ्याशिवाय सहजतेने कोरोना प्रतिबंधक (celebrity vaccination) लसीचे डोस मिळत आहेत, असा आरोप भाजपा आमदार अतुल भातखळकर (atul bhatkhalkar) यांनी केला आहे. मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने मात्र भातखळकरांचा हा आरोप फेटाळून लावला आहे. मुंबई मिररने हे वृत्त दिले आहे. (With Aadityas blessings celebrities getting vaccinated BJP MLA Atul Bhatkhalkar)

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आशिर्वादाने अनेक मोठ्या कलाकारांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कुठल्याही अडथळ्याशिवाय लसीचे डोस मिळतायत असे भातखळकरांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने बातमी दिली होती. कोरोना योद्धे असल्याच्या नावाखाली त्यांना लसी मिळत आहेत, असा आरोप करण्यात आला आहे.

हेही वाचा: डॅडींच्या 'दगडी चाळी'वर लवकरच पडणार हातोडा!

शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे. हे आरोप तथ्यहीन असल्याचे त्यांनी म्हटले आहे. "कुठल्याही सेलिब्रिटीला स्पेशल ट्रीटमेंट मिळत नाहीय. लस मिळवण्यासाठी सर्वच नागरिक त्यांच्यापरीने प्रयत्न करतायत" असे कायंदे यांनी म्हटले आहे.

loading image
go to top