मुंबई प्रमाणेच अन्य भागांच्या लसीकरणालाही प्राधान्य द्या, कारण...

तीन आठवड्यात लसीकरण पूर्ण करण्याचा आराखडा तयार
ncp leader ajit pawar appreciate aditya thackeray at nagpur winter session
ncp leader ajit pawar appreciate aditya thackeray at nagpur winter session

मुंबई: मुंबईसाठी प्राधान्याने लस खरेदी (mumbai vaccination procurment) करण्याचा विचार सुरु आहे. काल एका इंग्रजी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना स्वत: राज्य सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांनी ही माहिती दिली. मुंबईत कोरोनाची स्थिती (mumbai covid situation) आता नियंत्रणात येत आहे. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मुंबईलाही मोठा फटका बसला. मागच्या महिन्यात रुग्णसंख्या दिवसाला आठ ते दहा हजारपर्यंत पोहोचली होती. पण आता लॉकडाउनमुळे रुग्णसंख्या नियंत्रणात आलीय. मुंबईला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी वेगाने लसीकरण होणे महत्त्वाचे आहे. पण सध्या लसींचा तुटवडा जाणवतोय. (With mumbai vaccination in other parts of the state is also important)

ncp leader ajit pawar appreciate aditya thackeray at nagpur winter session
मुंबई मॉडेलच्या श्रेयावरुन मनसेचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईसाठी लसी आयात करण्याचा विचार सुरु आहे, असे काल सांगितले. आयात मार्गाने लसी उपलब्ध झाल्या, तर तीन आठवड्यात देशाच्या आर्थिक राजधानीचे लसीकरण पूर्ण करण्याचा आराखडा तयार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. "लसीची किती किंमत आहे, त्याने फरक पडत नाही. लवकरात लवकर लस खरेदी करण्याची राज्य सरकारची तयारी आहे" असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

ncp leader ajit pawar appreciate aditya thackeray at nagpur winter session
महाराष्ट्रात लॉकडाउन मे अखेरपर्यंत वाढणार, मंत्र्याने दिले संकेत

मुंबईत तरी स्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आलीय. पण अजूनही महाराष्ट्राच्या अन्य भागात रुग्णवाढ स्थिर होतेय. रुग्णसंख्या कमी झालेली नाही. त्यामुळे कोरोनाची साखळी मोडण्यासाठी तिथेही मोठ्या प्रमाणावर लसीकरण होण्याची आवश्यकता आहे. मुंबईला लसीकरणात प्राधान्य द्या पण त्याचवेळी अन्य भागातही तितक्या वेगाने लसीकरणाची योजना आखणे आवश्यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com