esakal | कुर्ल्यात 50 लाखांच्या एमडीसह सराईत महिलेला अटक; अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

कुर्ल्यात 50 लाखांच्या एमडीसह सराईत महिलेला अटक; अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने कुर्ला येथून 50 लाख 30 हजार रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले.

कुर्ल्यात 50 लाखांच्या एमडीसह सराईत महिलेला अटक; अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई ः केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतील तस्करांविरोधात कारवाईचा धडाका लावला असताना आता मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कक्षाने कुर्ला येथून 50 लाख 30 हजार रुपये किमतीचे एमडी हे अमली पदार्थ जप्त केले. याप्रकरणी शबिना सर्फराज खान (वय 26) या सराईत महिलेला अटक केली. वरळी कक्षाने ही कारवाई केली. 

हेही वाचा - 'आरेच्या जंगलात अल्पवयीन मुलीवर बलात्कार; सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या वरळी युनिटला खात्रीशीर माहिती मिळाली की, कुर्ला (प.), एलबीएस रोड, फैजी ए दाऊदी बोहरा कब्रस्थानच्या गेटसमोर एक महिला अमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे. त्यानुसार रविवारी सापळा लावून शबिना हिला 50 लाख 30 हजार रुपये किमतीचे 503 ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त केले. कुर्ला (प.) येथे राहणाऱ्या शबिना ही मुंबई व उपनगरांत एमडी या अमली पदार्थाची मोठ्या प्रमाणात तस्करी करीत असल्याचे उघड झाले आहे.

जोगेश्वरीतल्या तरुणीला फेसबुकवरील मैत्री पडली महागात

हे अमली पदार्थ ती कोठून व कोणासाठी आणत होती, याचा तपास पोलिस करीत आहेत. याप्रकरणी काही संशयित पोलिसांच्या रडारवर आले आहेत. 

woman arrested with Rs 50 lakh MD in Kurla Anti-drug squad action

----------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image