
सुप्रसिद्ध लावणी सम्राज्ञी विजया पालव यांना दिव्यात मारहाण
दिवा : राहत्या इमारतीमधील महिलांच्या दोन गटांत झालेल्या वादातून राज्य पुरस्कार विजेत्या लावणी सम्राज्ञी (Lavani Dancer) विजया पालव (Vijaya Palav) यांना महिलेकडून मारहाण (Beating case)करण्यात आल्याची घटना रविवारी दिव्यात घडली. या वादामध्ये पालव, इमारत विकासकाची पत्नी आणि त्याची भावजय जखमी झाली आहे. याप्रकरणी रविवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही.
हेही वाचा: यशवंत जाधव यांच्या दोन वर्षांत ३६ मालमत्ता!सोमय्या यांचा आरोप
दिवा पश्चिम भागातील सोनू प्लाझा या इमारतीमध्ये पालव यांनी चार वर्षांपूर्वी सदनिका खरेदी केली आहे. इमारतीच्या देखभालीची वाढवलेली रक्कम, तसेच घरामध्ये केलेल्या अंतर्गत कामाच्या वादातून महिलांच्या दोन गटांत वाद झाला. या इमारतीचा देखभालीचा खर्च विकासक जमा करत असून त्याने ८०० वरून १५०० रुपयांपर्यंत वाढ केली आहे. याचा विकासकाला जाब विचारण्यासाठी पालव या शेजारील महिलांसह गेल्या होत्या. त्या वेळी इमारत विकासकाने आपल्याला न विचारता घरातील अंतर्गत काम कसे केले अशी विचारणा केली. या वेळी महिलांमध्ये शाब्दिक चकमक होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले.
यात जखमी झालेल्या पालव आणि दोन महिलांना वैद्यकीय तपासणीसाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती दिवा पोलिस चौकीचे एपीआय शहाजी शेळके यांनी दिली. वैद्यकीय तपासणीनंतर गुन्हा दाखल होईल, असे पोलिसांनी सांगितले.
Web Title: Woman Beating Famous Lavani Dancer Vijaya Palav In Diva No Police Fir Filed
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..