Dombivli Accident : दुबईला जाण्याचं स्वप्न राहिलं अधुरं; डंपर खाली आल्याने डोंबिवलीत महिलेचा मृत्यू

डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे
woman died in Dombivli after being crushed by a dumper Marathi News Update
woman died in Dombivli after being crushed by a dumper Marathi News Update

डोंबिवली, ता. 2 - डंपरच्या मागच्या चाकाखाली सापडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना डोंबिवली पश्चिमेत घडली आहे. स्नेहा दाभिलकर (वय 52) असे मयत महिलेचे नाव आहे.

डोंबिवली पश्चिमेतील स्वामीनारायन सिटीमध्ये स्नेहा या कुटुंबासह राहतात. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी या संकुलात घर घेतले होते. स्नेहा यांचे पती सुधीर हे मुंबईत कामाला होते. वर्षभरापूर्वीच ते सेवानिवृत्त झाले आहेत. मोकळा वेळ मिळाल्याने सह परिवार दुबईला फिरण्यासाठी हे जाणार होते. बाहेरगावी फिरायला जावयाचे असल्याने पासपोर्ट त्यांनी काढला होता. रविवारी त्या पासपोर्ट व्हेरिफिकेशन साठी विष्णूनगर पोलीस ठाण्यात आपल्या पतीसह गेल्या होत्या. हे काम झाल्यानंतर घरी परतत असताना सम्राट चौकामध्ये त्यांच्या दुचाकीचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या. बाजूने जाणाऱ्या डंपरच्या मागील चाकाखाली त्या आल्या. त्यांना उपचारासाठी त्वरित पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

woman died in Dombivli after being crushed by a dumper Marathi News Update
Nandurbar Lok Sabha Constituency : निकालाचे काऊंट डाऊन सुरू! भाजप-कॉंग्रेसच्या नेते -पदाधिकाऱ्यांमध्ये वाढली धकधक

स्नेहा यांच्या अकाली मृत्यूने परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. स्वामींनारायण सिटी मध्ये 6 महिन्या पूर्वीच दाभिलकर परिवार राहण्यास आला होता. यापूर्वी ते डोंबिवलीतच भाड्याच्या घरात रहात होते. स्वतःचे हक्काचे घर झाले, पती सेवानिवृत्त झाले होते. त्यामुळे आता उरलेला वेळ हा परिवारासोबत आनंद घालवण्याचा विचार करत असतानाच काळाने या कुटुंबावर घाला घातला आहे. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत

woman died in Dombivli after being crushed by a dumper Marathi News Update
Wardha Constituency Lok Sabha Election Result: वर्ध्यात कोण जिंकणार? तडस हॅट्रिक करणार की काळे मारणार बाजी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com