
डोंबिवली : घरात देवाची पूजा करत असताना दिव्याची पेटती वात अंगावर पडून डोंबिवली पूर्वेतील पिसवली भागातील एक महिला गंभीररित्या भाजली होती. या महिलेवर डोंबिवली एमआयडीसीतील एका रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. शनिवारी ही घटना घडली असून अर्चना धर्मेंद्र कुमार (वय 48) असे मयत महिलेचे नाव आहे. या मृत्युप्रकरणी महिलेचा पती धर्मेंद्र कुमार यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्युची नोंद करून घेत पुढील तपास चालू केला आहे.