धक्कादायक बातमी! धारदार शस्त्राने 'तिच्या' डोक्यात करण्यात आले तब्बल 'इतके' वार; महिलेचा जागीच मृत्यू..वाचा बातमी.. 

अनीश पाटील 
सोमवार, 13 जुलै 2020

चेंबूर येथे 70 वर्षीय महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई: चेंबूर येथे 70 वर्षीय महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलेचा गळाही दाबण्यात आल्याचे व्रण असून घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या आढळल्या आहेत. याप्रकरणी टिळक नगर पोलिस अधिक तपास करत आहेत.

 हेही वाचा: प्लाझ्मा थेरपी संदर्भात फसवणूक होण्यापासून सावधान; गृहमंत्री अनिल देशमुख यांचं आवाहन.. 

सजनाबाई धोंडीबा पाटील असे मृत महिलेचे नाव असून त्या चेंबूर येथील पेस्तन सागर रोड येथील एसआरए इमारतीत राहतात. पाटील यांना गंभीर जखमी अवस्थेत राजावाडी रुग्णालयात तिचा पुतण्या आनंद पाटील याने आणले.

हेही वाचा: दिलासादायक बातमी! मुंबईत रुग्ण दुपटीचा दर गेला 51 दिवसांवर; आज दिवसभरात तब्बल 'इतक्या' रुग्णांची नोंद.. 

 त्या बाथरुममध्ये पडल्याचे सांगण्यात आले. पण दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यावेळी त्या महिलेच्या डोक्यात धारदार शस्त्राने 14 वार करण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तसेच दोरीनेही तिचा गळा आवळण्यात आल्याचे व्रण आहेत. 

हेही वाचा: मोठी बातमी! यंदा 'या' ठिकाणी होणार सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्तीचे विसर्जन..वाचा सविस्तर बातमी.. 

घरात जाऊन पाहणी केली असता सर्व वस्तू अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. त्यावरून अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने व गळा आवळून महिलेची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. अखेर टिळक नगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

संपादन : अथर्व महांकाळ 

woman found in extreme condition in chembur 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: woman found in extreme condition in chembur