Palghar NewsESakal
मुंबई
Palghar News: भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला निर्णय
Boisar: पालघर - मनोर रस्त्यावर मुसळधार पावसात रुग्णवाहिकेत महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला थांबून सुखरूप प्रसूती केली.
सुमित पाटील
बोईसर : पालघर - मनोर रस्त्यावर गुरुवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसात १०८ रुग्णवाहिकेत सुमित्रा पाटील (२६) या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. विशेष म्हणजे भर पावसातून या महिलेला घेऊन रुग्णवाहिका जात होती. मात्र, तिच्या प्रसूतीकळा वाढल्याने आणि पावसात रुग्णालय गाठण्यास वेळ लागू शकतो, हे लक्षात घेत रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी प्रसंगावधान राखत रस्त्याच्या कडेला थांबून सुखरूप प्रसूती केली.