Thane Crime: ठाण्यातील धक्कादायक घटना ! जुन्या वादातून महिलेची हत्या, लोखंडी पाईपने केला होता हल्ला

जुन्या भांडणाच्या रागातून महिला आणि तिच्या १४ वर्षीय मुलावर लोखंडी पाईपने हल्ला केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी कोकणीपाडा येथे घडली.
 Crim News
Crim Newsesakal
Published on

Thane News: जुन्या भांडणाच्या रागातून महिला आणि तिच्या १४ वर्षीय मुलावर लोखंडी पाईपने हल्ला केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी कोकणीपाडा येथे घडली. यामध्ये दुर्गा कुंटे (वय ४०) यांचा मृत्यू झाला असून मुलगा गंभीर जखमी आहे. याप्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात आरोपी संजू लोखंडे विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता. २७) झालेल्या भांडणाचा राग मनात धरून दुर्गा अनिल कुंटे यांच्यावर आरोपीने लोखंडी पाईपने हल्ला केला. या हल्ल्यात दुर्गा यांच्या डोक्यावर, चेहऱ्यावर पाईपचे प्रहार झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. तसेच त्यांच्या मुलाच्या डोक्यात लोखंडी पाईपने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी चितळसर पोलिस अधिक तपास करीत आहेत. (Latest Marathi News)

 Crim News
Sextortion Mumbai:मुंबईत सेक्सटॉर्शनचा आणखी एक बळी ! फेसबुकवरुन महिलेशी मैत्री, एका व्हिडीओ कॉलनंतर गमावले ४३ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com