नालासोपारा : हॉटेलमध्ये मैत्रिणीची हत्या; फरार आरोपीचा शोध सुरू | Nalasopara crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder crime

नालासोपारा: हॉटेलमध्ये मैत्रिणीची हत्या; फरार आरोपीचा शोध सुरू

नालासोपारा : वसईतील (Vasai) हॉटेलमध्ये मित्राने-मैत्रिणीची निर्घृणपणे हत्या (Murder crime) केल्याची घटना आज उघड झाली. याबाबत वसई पोलिस ठाण्यात (vasai police station) हत्येचा गुन्हा दाखल (Murder case) करून फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सागर नाईक व सायली शहासने हे दोघेही वसईच्या एव्हरशाईन परिसरात राहणारे आहेत. रविवारी (ता. २७) या दोघांनी ऑनलाईन रूम बुक करून स्टेट्‍स हॉटेलमध्ये गेले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तरुण हॉटेलमधून निघून गेला.

हेही वाचा: डोंबिवली : मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीचा मृत्यू!

हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी रात्री रूमचे दार वाजविले असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आज सकाळीही चेकआउटवेळी कोणतेही उत्तर न मिळाल्याने पोलिसांच्या उपस्थितीत दरवाजा उघडला असता सायली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळून आली. तिच्या शरीरावर धारदार हत्याराने वार करून हत्या केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे वसई पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कल्याणराव करपे यांनी सांगितले.

Web Title: Woman Killed In Hotel At Vasai Culprit Absconding After Crime Nalasopara Crime Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :nalasoparacrime update
go to top