डोंबिवली : टिळकनगर परिसरात ५८ वर्षांच्या महिलेची हत्या |Dombivali crime update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder
डोंबिवली : टिळकनगर परिसरात ५८ वर्षांच्या महिलेची हत्या

डोंबिवली : टिळकनगर परिसरात ५८ वर्षांच्या महिलेची हत्या

डोंबिवली : घरात एकट्या राहणाऱ्या 58 वर्षीय महिलेची गळा आवळून (Woman murder) हत्या करण्यात आल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे. घरकाम करणारी महिला घरी आल्यानंतर ही घटना उघडकीस आली असून विजया बाविस्कर (Vijaya baviskar died) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात (Tilak nagar police station)अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (woman killed in tilak nagar dombivali police complaint filed against culprit)

हेही वाचा: पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक : प्रकरणाची चौकशी करणाऱ्या माजी न्यायमूर्तींना धमक्या

डोंबिवली पूर्वेतील टिळकनगर परिसरातील आनंदशीला सोसायटीमध्ये विजया बाविस्कर या एकट्या राहत होत्या. सोमवारी सकाळी घरकाम करणारी महिला कामासाठी आली असता हा प्रकार उघडकीस आला. शेजाऱ्यांनी त्वरित या घटनेची माहिती टिळकनगर पोलीसांना दिली.

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत विजया यांचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी महापालिकेच्या रुग्णालयात पाठविला आहे. अज्ञात मारेकऱ्याने रात्रीच्या वेळेस घरात घुसून महिलेची गळा आवळून हत्या केल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. याचा अधिक तपास व मारेकऱ्याचा शोध टिळकनगर पोलीस घेत आहेत.

Web Title: Woman Killed In Tilak Nagar Dombivali Police Complaint Filed Against Culprit

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :dombivalicrime update
go to top