
मुंबई : मानवतेची सेवा काय असते, हे खरे करून दाखवत मुंब्रा स्थानकावर रेल्वे पोलिसांनी प्रसुतीकळा सुरू झालेल्या महिलेला वेळेत रुग्णालयात दाखल करून तिचा आणि नवजात बाळाचा जीव वाचवला. या सत्कार्यामुळे पोलीस कर्मचारी आणि महिला प्रवाशांचे सर्वत्र कौतुक होत आहे.