मुंबईच्या रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत सांगून कोरोना पॉझिटिव्ह महिला निघाली आणि थेट गाठलं विमानतळ आणि जे झालं ते...

मुंबईच्या रुग्णालयात उपचार घ्यायचे आहेत सांगून कोरोना पॉझिटिव्ह महिला निघाली आणि थेट गाठलं विमानतळ आणि जे झालं ते...

मुंबई - एकीकडे मुंबई आणि उपनगरात कोरोना रुग्णांचा आकडा अजिबात नियंत्रणात येत नाहीये. तर दुसरीकडे नागरिकांना कोरोनाचा सिरीयसनेस अजूनही आलाय की नाही असा प्रश्न विचारायची आता वेळ आलीये. हा प्रश विचारण्यास कारण ठरतेय ती मुंब्रा भागातील एक महिला. ही महिला कोरोना पॉझिटिव्ह आहे. कोरोना पॉसिटीव्ह असतानाही या महिलेला मुंबई नजीकच्या मुंब्रा भागातून थेट लखनऊला जायचं होतं. तसा तिने प्लॅन देखील आखला होता.  

मिळालेल्या माहितीनुसार ही महिला मुंब्रा भागातील आहे. या महिलेने मुंबईतील सेवन हिल्स या रुग्णालयात उपचार घेण्याचा बहाणा केला आणि थेट मुंबई विमानतळ गाठलं. मात्र ठाणे महानगरपालिका आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांना ही बाब निदर्शनास आली. त्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून या महिलेला आणि सोबत तीन मुलांना ताब्यात घेण्यात आलंय. आता या सर्वांना मुंब्रा भागातील अलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय असं समजतंय.    

आरोग्य सेतू ऍपच्या माध्यमातून बाब आली समोर 

सदर महिला ठाण्यानजीकच्या मुंब्रा भागात राहणारी आहे. या महिलेच्या नवऱ्याचा कोरोनामुळे २९ तारखेला मृत्यू झाला. यानंतर करण्यात आलेल्या टेस्टमध्ये ही महिला आणि तीन मुलं पॉझिटिव्ह असल्याची बाब निदर्शनास आली. तिला मुब्रामधील आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलं. मात्र तिने मी मुंबईतील सेवन हिल्स या रुग्णालयात उपचार घेते असा बहाणा केला. मुब्रामधून सोडल्यानंतर तिने मुंबई विमानतळ गाठलं. मात्र मोबाईलमधील आरोग्य सेतू या ऍप च्या माध्यमातून तिच्या लोकेशनची माहिती ठाणे आरोग्य विभागाला मिळाली. आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने पोलिसांच्या साहाय्याने या महिलेला ताब्यात घेतलं आणि तिला पुन्हा मुंब्रा येथील क्रीडा संकुलातील विलगीकरण कक्षात क्वारंटाइन केले    

मुंब्रा येथील कोरोना अलगीकरण कक्षात ठेवल्यामुळे आपल्याला आणि मुलांना वेगवेगळे ठेवले जाईल या भीतीपायी मी हे पाऊल उचललं असं या महिनेने सांगितलंय. दरम्यान तिच्यावर ओढवलेल्या परिस्थितीचा विचार करता या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, असे मुंब्रा पोलिसांनी सांगितलं आहे. 

women with covid19 positive gave excuse of shifting to another hospital and reached mumbai airport

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com