

Women Gives Birth In Rickshaw
ESakal
उल्हासनगर : उल्हासनगर येथील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर एका गर्भवती महिलेला तीव्र प्रसूतीवेदना सुरू झाल्या. अशा अत्यंत आणीबाणीच्या प्रसंगात तेथे उपस्थित असलेले पोलिस शिपाई सतीश करले मदतीला धावून आले. त्यांच्या प्रसंगावधानामुळे रिक्षातच या महिलेची सुखरूप प्रसूती झाली.