
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानात उपोषणाचे शस्त्र उगारले आहे. त्यांच्या आंदोलनात महिला आंदोलकांची संख्या तुरळक दिसत आहे; मात्र गौरी विसर्जन झाल्यानंतर राज्यभरातील महिला आंदोलक आझाद मैदानावर धडकणार असल्याची माहिती महिला समन्वयकांनी दिली.