"माझ्यासोबत जे घडलं ते इतर कुणासोबतही घडू शकतं" | Women's day update | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vaishali gaikwad

"माझ्यासोबत जे घडलं ते इतर कुणासोबतही घडू शकतं"

डोंबिवली : महिला सुरक्षित नाहीत (woman safety) त्याविषयीच्या घटना आपल्या आजूबाजूला घडतात...पण हे आपल्यासोबत देखील घडू शकतो हे आपल्या मनात येत नाही. पण हे होऊ शकतो कुणासोबतही होऊ शकते. अशी घटना आपल्यासोबत घडल्यास आपण त्वरीत काय पाऊल उचलावे...कोणाकडे मदत मागावी ही माहिती घराघरातील प्रत्येक महिलेला व्हावी यासाठी डोंबिवलीतील (dombivali) सर्वसामान्य महिला वैशाली गायकवाड (Vaishali gaikwad) या पुढे आल्या आहेत. महिला दिनी (women's day) महिलांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले असून पोलिसांची भेट घेत महिलांमध्ये याविषयी सजगता आणण्याचे त्यांनी ठरविले आहे.

हेही वाचा: 'बेस्ट'च! आजपासून मुंबईत २४ तास बससेवा

डोंबिवली येथे राहणाऱ्या वैशाली गायकवाड यांचा स्वतःचा व्यवसाय आहे. महिला सुरक्षित नाहीत याविषयी आपण अनेकदा ऐकतो काही घटना आजूबाजूला देखील घडत असतात. पण आपल्या सोबत असे काही घडेल असे कोणालाच वाटत नाही. माझ्यासोबत असे काही होईल हे मला देखील वाटले नाही. परंतू फेब्रुवारी महिन्यात रात्रीच्या वेळेस प्रवास करताना एका व्यक्तीने माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. केवळ रस्त्यावर नाही तर माझ्या घरापर्यंत तो पाठलाग करीत आला. सोसायटीमधील नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे तो पकडला गेला.

माझ्यासोबत जे घडले ते इतर कोणासोबत देखील घडू शकते. आपल्यासोबत असे काही होणार नाही हे आपण ठाम पणे सांगू शकत नाही? कारण येथे महिला सुरक्षित नाहीत. या महिलांच्या सुरक्षिततेसाठी एक महिला म्हणून डोंबिवलीतील वैशाली गायकवाड, तृप्ती दिघे व नमिता दोंदे यांनी एकत्र येत महिलांमध्ये सुरक्षिततेविषयी सजगता आणण्यासाठी महिलादिनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महिला दिनी महिलांचे सत्कार केले जातात, पुरस्कार दिले जातात पण यापेक्षा तिची सुरक्षितता ही सर्वात महत्वाची आहे. माझ्या सोबत असे काही होईल मला वाटले नव्हते, तसे कोणालाच वाटत नाही.

पण महिला आज अनेक अत्याचाराच्या बळी ठरत आहेत. माझ्यासोबत असा प्रसंग झाल्यानंतर सर्वसामान्य महिलांसाठी आपण काही केले पाहीजे असे मला वाटले म्हणून महिला दिनी 8 मार्चला सायंकाळी 6.30 वाजता फडके रोड, तरी हॉटेल येथे केवळ 40 मिनीटांसाठी एकत्र येण्याचे आवाहन आम्ही महिलांना केले आहे. महिलांशी चर्चा करुन नंतर आम्ही रामनगर पोलिसांची भेट घेणार आहोत. पोलिसांनी रात्रीच्या वेळेस गस्त वाढवावी, हेल्पलाईन नंबर कायम चालू ठेवावे याविषयी त्यांना निवेदन दिले जाणार आहेत. हे नंबर महिलांना कसे पटकन उपलब्ध होतील यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी चर्चा केली जाणार असल्याचे वैशाली यांनी सांगितले.

Web Title: Womens Should Come Together On International Womens Day For Womens Safety Purpose Says Vaishali Gaikwad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :dombivaliwomens
go to top