esakal | आरे मधील कारशेड कांजूरला हलवण्याचे काम सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

Mumbai : आरे मधील कारशेड कांजूरला हलवण्याचे काम सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अरे मधील कारशेड च्या कामाला स्थगिती दिल्यानंतर अखेर वर्षभरानंतर मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाने प्रत्यक्षात कारशेड कांजूर ला हलवण्यास सुरुवात केली. आरे कारशेड विरोधात लढा उभारणाऱ्या पर्यावरण संघटनांनी याचे स्वागत केले आहे.

मुंबई मेट्रो रेल्वे प्राधिकरणाने पत्राद्वारे आरे कारशेड कांजूरला हलवण्याचे काम सुरू केले असल्याच्या माहितीला दुजोरा दिला आहे. भूमिगत मेट्रो चे काम मात्र सुरू राहणार आहे. काही भागात ट्रॅक टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणी काम सुरू आहे. मात्र कारशेड डेपो आणि इमारतिचे काम थांबवण्यात आले असल्याचे माहिती आरे बचाव आंदोलनातील कार्यकर्ते झोरू भतेना यांनी दिली. आरे कारशेड विरोधातील संघर्ष केलेले कार्यकर्ते उद्या आरे मध्ये जाऊन भेट देणार आहेत. यावेळी ते प्रत्यक्ष कशा प्रकारे कारशेड हलवण्याचे काम सुरू आहे त्याची पाहणी करणार आहेत अशी माहिती कार्यकर्ते झोरू भतेना यांनी दिली.

हेही वाचा: NCB कडून ड्रग्ज सप्लायरला अटक; आर्यनला ड्रग पुरवल्याचा संशय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे मधील प्रस्तावित कारशेड प्रकल्प कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय़ घेतला. यासाठी पालकमंत्री आदित्य ठाकरे आग्रही होते.आरे मधील मेट्रो कारशेडच्या जागेवरील भुमापनाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. तिथे तयार झालेल्या मेट्रो भवन इमारतीचे काय करणार याची ही चर्चा ठाकरे यांनी केली होती.

मेट्रो 3 आणि मेट्रो 6 प्रकल्पाचे दोन्ही कारशेड हे कांजूरमार्ग ला एकाच जागेवर उभारण्यात येणार आहेत. शिवाय आरे पर्यंतचे जे मेट्रोचे काम झाले आहे त्याचा ही वापर केला जाणार आहे. हे काम तसेच त्यासाठी केलेला खर्च वाया जाणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे.

loading image
go to top