esakal | Cruise Drug Case : NCB कडून ड्रग्ज सप्लायरला अटक; आर्यनला ड्रग पुरवल्याचा संशय
sakal

बोलून बातमी शोधा

Aryan Khan

NCB कडून ड्रग्ज सप्लायरला अटक; आर्यनला ड्रग पुरवल्याचा संशय

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीनं एका ड्रग्ज सप्लायरला अटक केली आहे. श्रेयस नायर असं या सप्लायरचं नाव असून त्याचा आर्यन खानला ड्रग पुरवण्याशी संबंध असल्याचा दावा एनसीबीनं केला आहे. श्रेयस नायर हा गोरेगाव येथील रहिवासी असून तो हायप्रोफाईल ड्रग्ज तस्कर असून त्यानं क्रूझवरील रेव्ह पार्टीत २५ जणांना ड्रग्ज पुरवले होते, अशीही माहिती समोर आली आहे.

श्रेयसकडून एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी MDMA ड्रग्जच्या गोळ्या, मेफेड्रोन आणि इतर बंदी असलेले अंमली पदार्थ त्याच्याकडून जप्त केले आहेत. डार्कनेटवरुन तो या ड्रग्जच्या ऑर्डर स्विकारत होता. तर ग्राहकांना तो क्रिप्टोकरन्सीच्या (बिटकॉईन) माध्यमातून विकत होता. टाइम्सनाऊ न्यूजने याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: "कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चिन्हं नाहीत" - मुंबई महापालिका

एनसीबीच्या साध्या वेशातील पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी मुंबईजवळील समुद्रात 'कॉर्डेलिया' या लक्झरी क्रूझवरील रेव्ह पार्टी उधळल्यानंतर बॉलिवूडचा मेगास्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह इतर सात जणांना ताब्यात घेतलं होतं. या क्रूझवर छापा टाकण्यापूर्वी खबऱ्यांमार्फत दोन आठवड्यांपासून एनसीबीच्या अधिकाऱ्यांचा यावर होणाऱ्या पार्टीवर जवळून लक्ष होतं. त्यानंतर रविवारी अधिकृतरित्या सात जणांना पोलिसांनी अटक केली.

loading image
go to top