हार्बर रेल्वे मार्गावरील उन्नत मार्गावरचे काम संथगतीने; अनलॉकमध्येही कामाला गती नाही 

हार्बर रेल्वे मार्गावरील उन्नत मार्गावरचे काम संथगतीने; अनलॉकमध्येही कामाला गती नाही 
Updated on


मुंबई : हार्बर मार्गावरील प्रवाशांना अवेळी लोकल आणि गर्दीचा प्रवास करावा लागतो.  हा त्रास कमी करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाकडून हार्बर मार्गावरून जाणाऱ्या लोकलचा उन्नत मार्ग तयार करण्यात येत आहे. अनेक कालावधीपासून हे काम संथगतीने सुरू आहे. परिणामी, रेल्वे प्रवास सुखकर आणि सुरक्षित कधी होणार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे. 
सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल या स्थानकादरम्यान लोकल चालविल्या जातात. तर, फलाट १ ते ६ वरून सीएसएमटी ते कल्याण दिशेकडे लोकल सुरू असतात. मात्र फलाट क्रमांक ७ आणि ८ वरून माल गाडी आणि इतर गाड्यामुळे उपनगरीय प्रवाशांचा लोकल प्रवास उशीराने होतो. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी उन्नत मार्गाच्या प्रकल्पाला गती देणे आवश्यक होते. मात्र अनलॉक काळात प्रकल्पाला गती मिळाली नाही. दरम्यान, प्रकल्पाचे 30 ते 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. 
उन्नत मार्गाचे काम करण्यासाठी  कुर्ला येथे दोन नवीन रेल्वे मार्ग तयार केला आहे. या मार्गावरून हार्बर मार्गावरील लोकल सेवा धावेल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कुर्ला स्थानकावरील हार्बर मार्गाच्या फलाट क्रमांक ७ आणि ८ जवळ उन्नत मार्ग बनविण्यात येत आहे. उन्नत मार्गाचे काम कसाईवाडा येथून सुरू आहे. या मार्गाचा शेवट सांताक्रुझ- चेंबूर लिंक रोड येथे म्हणजे लोकमान्य टिळक टर्मिनस येथे संपणार आहे. या मार्गाची लांबी १.१ किमी आहे. कसाईवाडा येथे तीन फलाटे उभारण्यात येणार आहेत. पादचारी पूल, स्कॉयवॉक बनविण्यात येणार आहे. यासह येथे ३ हजार ४५० चौमी जागेत दुकाने, खाद्यपदार्थाची दुकाने, प्रवाशांसाठी अतिरिक्त जागा प्रदान करण्यात येणार आहे. 

हार्बर उन्नत मार्गाचे खांबे उभारण्यात आले आहेत. यासह इतर पायाभूत कामे करण्यात येत आहे. असे संपूर्ण प्रकल्पाचे 30 ते 35 टक्के काम पूर्ण झाले आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास हार्बर  मार्गावरील प्रवाशांना इच्छितस्थळी वेळेत पोहचता येणार आहे.

हार्बर मार्गावरील उन्नत मार्ग उभारणीसाठी कुर्ला स्थानकावरील सीएसएमटी दिशेपासून ते लोकमान्य टिळक स्थानकापर्यंत बनविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी १२५ कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे.

Work on the elevated route on the Harbor Railway has been slow There is no speed in the work even in unlock

--------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com