'वर्क फ्रॉम होम’मुळे इंटरनेट वापरात झाली मोठी वाढ; ब्रॉडबँड कनेक्शनची संख्या 'इतकी' वाढली

विनोद राऊत
Sunday, 30 August 2020

मार्च ते मेपर्यंत इंटरनेटचा वापर वाढत गेला. मे महिन्यात देशातील एकुण ब्राडबँड कनेक्शनची संख्या 67 कोटी वरुन 68 कोटींवर पोहोचली आहे.

मुंबई : लॉकडाऊनमुळे बहुतांश कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरात बसून काम करण्यास परवानगी दिली होती. त्यामुळे मार्च ते मेपर्यंत इंटरनेटचा वापर वाढत गेला. मे महिन्यात देशातील एकुण ब्राडबँड कनेक्शनची संख्या 67 कोटी वरुन 68 कोटींवर पोहोचली आहे. यामध्ये मोबाईल डेटा वापरणाऱ्याची संख्या सर्वाधिक आहे. ब्राडबँड सेवेत प्रामुख्याने मोबाईल ब्रॉडबँड, वायरलाईन आणि वायरलेस ब्रॉडबँड सेवेचा समावेश आहे.

लॉकडाऊनमध्ये ब्रॉडबँड सेवा घेणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. एप्रिलमध्ये देशातील 67 कोटी 41 लाख ग्राहकांनी ब्रॉडबँड सेवा घेतली. मे महिन्यात एकुण ब्रॉडबँड ग्राहकांच्या संख्येत 1.88 टक्क्याने वाढ होऊन ती 68 कोटी 37 लाखांवर पोहोचली आहे.

लाॅकडाऊन काळात रेल्वे मालवाहतुकीमुळे 'मालामाल'; गेल्या वर्षीच्या तुलनेत महसूलात 4.3 टक्याने वाढ

जिओचा दबदबा 
देशात मोबाईल ब्रॉडबँड सेवेत जिओचा दबदबा आहे. जिओ सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या 39 कोटी आहे. तर, एयरटेलकडे 14 कोटी, वोडाफोन आयडियाकडे 11 कोटी, बीएसएनएलकडे 2.2 कोटी मोबाईल ब्रॉडबँड सेवा वापरणारे ग्राहक आहेत. 
....
घर, कार्यालयांत बीएसएनएललाच पसंती 
घरात,  कार्यालयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या फिस्क लाईन ब्रॉडबँड सेवेत बीएसएनएलने आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे. 31 मेपर्यंत बीएसएनएलचे सर्वाधिक म्हणजे 70 लाख ग्राहक होते. तर, एयरटेल सेवा वापरणाऱ्या ग्राहकाची संख्या 20.41 लाख होती. आत्रिया कन्वर्जेस टेक्नॉलाजीकडे 10.64 लाख, हाथ वे केबलक़डे 97 हजार तर, रिलायंस जिओकडे 97 हजार ग्राहक होते.
...
 ग्राहकांची संख्या आणखी वाढणार 
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा वगळता इतर शासकीय, खाजगी कार्यालये बंद होती.  काही महिन्यानंतर खाजगी कार्यालयेदेखील 10 ते 15 टक्के कर्मचारी क्षमतेने सुरु झाली. त्यामुळे या काळात कर्मचाऱ्यांना घर बसल्या काम करण्याची मुभा दिली गेली. या काळात  इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने ब्रॉडबँड कनेक्शनमध्येही वाढ झाली. जुलै, ऑगस्ट महिन्यात या संख्येत अजून वाढ होईल, असे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. 

मुंबईकरांनो संकट टळलेलं नाही! वांद्रे, कुलाब्यात कोरोना संसर्गात वाढ; उत्तर मुंबईची परिस्थिती जैसे थे

ब्रॉडबँड सेवा बाजारातील टेलिफोन  कंपन्यांचा वाटा 
(31 मे पर्यंतचे चित्र))
रिलायंस जिओ- 57.58  %
भारती एयरटेल – 21.35  %
वोडाफोन आयडिया- 16.53  %
बीएसएनएल- 3.23  %
आत्रिया कन्वर्जेस- 0.23  %
...
ब्रॉडबँड सेवेचे ग्राहक वाढले  
महिना- एप्रिल
एकुण ग्राहक संख्या - 67 कोटी 41 लाख 
मोबाईल ब्रॉडबँड- 65 कोटी 
फिक्स ब्रॉडबँड- 1 कोटी 90 हजार
वायरलेस ब्रॉडबँड- 61 लाख
....
मे 
एकुण ग्राहक संख्या - 68 कोटी 37 लाख
मोबाईल ब्रॉडबँड-  66 कोटी 37 लाख
फिक्स ब्रॉडबँड- 1 कोटी 93 लाख
वायरलेस ब्रॉडबँड- 61 लाख
ग्राहक वाढीचे प्रमाण- 1.88 टक्के

-----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work from home has led to a huge increase in internet usage; jios dominance remains