
मुलुंड : मुलुंड पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या ५० वर्षे जुन्या पादचारी पुलाचे काम सुरू झाल्याने मुलुंडकरांची गैरसोय दूर होणार आहे. गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या पादचारी पुलाचे काम सुरू करावे, यासाठी स्थानिकांनी पालिकेकडे मागणी केली होती. अखेर बुधवारपासून (ता. ६) या पुलाचे काम रेल्वेने सुरू केले आहे.