निळजे नवीन पुलावरुन जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. लोढा पलावा येथे जाणाऱ्या दुचाकीस्वारांना निळजे गावातून वाहतूक करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
डोंबिवली : नवी मुंबईसह पुण्याच्या दिशेने जाण्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कल्याण शीळ मार्गावरील (Kalyan Shilphata Road) निळजे उड्डाणपुलाच्या पुर्नबांधणी कामाला बुधवारी मध्यरात्रीपासून सुरुवात करण्यात आली आहे. या कामामुळे जुना निळजे पूल (Nilaje Bridge) वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून नवीन पुलावरुन हलक्या वाहनांची वाहतूक सुरु आहे.