भिवंडी उपज़िल्हा रुग्णालय विरोधात श्रमजीवी आक्रमक

hospital
hospital

वज्रेश्वरी : भिवंडी तालुक्यातील स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्ह्यारुग्णालयात रुग्णांवर उपचार न करताच त्यांना ठाणे येथे पाठविण्याच्या मनमानी विरोधात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकऱ्यांनी आज येथे गोंधळ घातला आणि डॉक्टरवर प्रश्नांचा भडिमार करत त्यांना चांगेलच धारेवार धरले.

तालुक्यातील कवाड़ विश्वभारती फ़ाटा येथील निर्मला काटेसकर या आदिवासी महिलेच्या शरीरातील हिमोग्लोबिन चे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने तिला इंदिरा गांधी उपज़िल्हा रुग्णालयात उपचारसाठी आणण्यात आले, मात्र डॉक्टरानी तिला रुग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देत पुढे उपचारासाठी जाण्याचा सल्ला देण्यात आला त्यामुळे गरीब कुटुंबीय हतबल  झाले. गरीब कुटुंबियांनी श्रमजीवी संघटनेचे युवक अघाड़ीचे जिल्ह्य अध्यक्ष प्रमोद पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते आपल्या कार्यकर्तासह रुग्णालयात दाखल झाले आणि वैद्यकीय अधिक्षक डॉ अनिल थोरात यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. उपज़िल्हा रुग्णालयात ज्या सुविधा असव्यात त्या देण्यात शासन असफल होत असेल तर गरीब आदिवासी रुग्णांनी उपचारसाठी जायचे कुठे? असा सवाल उपस्थित केला.

तेथील उर्मट वर्तनुक करणारे डॉक्टर, मदतनीस यांच्या कार्य पद्धतीबाबत ही त्यांनी तक्रार केली येथे. रुग्ण ओळखीचा असल्यास उपचार होतात, अन्यथा रुग्ण उपचारचसाठी ठाणे, मुंबई अथवा हित संबध असलेले खाजगी रुग्णालयात पाठविले जातात. त्यामुळे स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालय हे रेफ्रेंस व रेफर रुग्णालय झाले असल्याची टिका करीत श्रमजीवी युवक आघडीचे कार्यकर्ते या बाबत वैद्यकीय अधिक्षकांना जाब विचारण्यासाठी उद्या सोमवारी रुग्णालयात परत उघड़कतील असा इशारा दिला. या आंदोलनात युवक पदाधिकारी मुकेश भांगरे, कल्पेश(बालू) जाधव, दिनेश पाटील, भूषण घोड़वीदे, रविन्द्र उगले, ललित शेलके,विजय रावते, सुनील धापसी, किशोर हुमने, प्रणय डोंगरे, इंद्रजीत गुरव, रोहित पाटील, प्रवीण पवार, अर्जुन गेंजे, दत्ता काटेस्कर यांच्या सह अनेक जण या वेळी सहभागी झाले होते. या प्रकारा नंतर डॉक्टर अनिल थोरात यांनी रुग्णास उपचारसाठी दाखल करून घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com