esakal | इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन पडून मजूराचा दुर्दैवी मृत्यु
sakal

बोलून बातमी शोधा

death

इमारतीच्या अकराव्या मजल्यावरुन पडून मजूराचा दुर्दैवी मृत्यु

sakal_logo
By
श्रीकांत खाडे

अंबरनाथ : इमारतीच्या अकराव्या  मजल्यावरुन  पडूंन एका  मजूराचा दुर्दैवी  मृत्यु झाल्याची घटना बदलापुर मध्ये आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. रामदास गौतम  (वय 24)असे या दुर्घटनेत मरण पावलेल्या मजुराचे नाव आहे. बदलापूरच्या  कात्रप परिसरात थारवानी प्रीमियम सिटी या गृहसंकुलाचे  बांधकाम सुरू आहे . या बांधकामावर गौतम हा  मजूर काम करत होता. इमारतीच्या अकराव्या  मजल्यावर सिमेंटच्या गोण्या वाहून नेताना गौतमचा  तोल जाऊन तो लिफ्टच्या डक मध्ये कोसळला.

डकमध्ये पाणी असल्याने बदलापूर अग्निशमन दलाला  घटनास्थळी पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी जाऊन  मजूराला डकमध्ये साचलेल्या पाण्यातून बाहेर काढले  मात्र डोक्याला जबर मार लागल्याने गौतमचा  जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करीत आहे,

loading image
go to top