- सुमित पाटील
बोईसर - बोईसर तारापूर औद्योगिक वसाहत (एमआयडीसीतील) विराज प्रोफाइल कंपनीत सोमवारी (ता. २५) घडलेल्या घटनेने पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. कंपनी परिसरात टायर ब्लास्ट होऊन एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.