prasad sankhe
sakal
- सुमित पाटील
बोईसर - बोईसर-तारापूर औद्योगिक क्षेत्रातील साल्को एक्सट्रूजन प्रायव्हेट लिमिटेड प्लॉट जे – ६३, ६४, या अॅल्युमिनियम उत्पादन करणाऱ्या उद्योगात आज सकाळी झालेल्या विजेच्या अपघातात प्रसाद संखे (वय ३६) या तरुण कामगाराचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरातील कामगारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, कारखान्यातील सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.