... अन्‌ कोरोनाच्या धास्तीमुळे २० कामगार पळाले!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 मार्च 2020

खारघरमधील ग्रामविकास भवनात कोरोनाच्या संशयित रुग्णास तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळताच, त्या ठिकाणी साफसफाईचे काम करणाऱ्या जवळपास वीस कामगारांनी सकाळीच पळ काढल्याचे ग्रामविकास भवनमधील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

पनवेल : खारघरमधील ग्रामविकास भवनात कोरोनाच्या संशयित रुग्णास तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती मिळताच, त्या ठिकाणी साफसफाईचे काम करणाऱ्या जवळपास वीस कामगारांनी सकाळीच पळ काढल्याचे ग्रामविकास भवनमधील एका कर्मचाऱ्याने सांगितले.

ही बातमी वाचली का? ...बनावट मास्क विक्रीतून नागरिकांची लूट!
 
खारघर सेक्‍टर 21 मधील भूखंड क्रमांक 76 ए येथील 3138 चौरस मीटर जागेवर उभारलेल्या ग्रामविकास भवनामध्ये जवळपास 64 खोल्या असून, सहाशेहून अधिक व्यक्ती बसू शकतील. इतक्‍या क्षमतेचे सभागृह, तसेच स्वतंत्र स्वयंपाकगृह आणि भोजनकक्ष उभारण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी ठेकेदारी पद्धतीने जवळपास 20 ते 25 साफसफाई कर्मचारी व शिपाई कामगार कार्यरत होते. मात्र, शनिवारी रात्री या भवनामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संशयित रुग्णास ठेवण्यात येणार असल्याची कुणकुण कामगारांना लागली होती. 

ही बातमी वाचली का? मुंबईच्या ...'या' भागात सुरू झालीये रो-रो सेवा

रविवारी सकाळी पालिका आयुक्त गणेश देशमुख यांचा भवन प्रशासकास कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्य साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यानुसार भवनाच्या अधिग्रहणाचा आदेश प्राप्त झाला. त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांनी भीतीपोटी पलायन केले. पालिकेने ग्रामविकास भवनचे अधिग्रहण करताच, या ठिकाणच्या सफाई कामगार आणि कार्यालयीन कामगारांस हजर होण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, यातील वीस कामगारांनी सकाळीच पळ काढल्याचे समोर आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Workers' escape from rural development building in Kharghar due to fear of Corona