घरातून काम करणं झालंय सोपं; जिओने केली "ही" घोषणा

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

लॉकडाऊनच्या काळात देशात अनेक जण घरातून काम करत आहेत. त्यासाठी लॅपटॉप, मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. त्यामुळे इंटरनेट डेटा लवकर संपण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही समस्या ध्यानात घेऊन रिलायन्स जिओने अधिक डेटा आणि कॉलिंग देणाऱ्या नव्या प्री-पेड प्लॅनची घोषणा केली आहे.

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात देशात अनेक जण घरातून काम करत आहेत. त्यासाठी लॅपटॉप, मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. त्यामुळे इंटरनेट डेटा लवकर संपण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. ही समस्या ध्यानात घेऊन रिलायन्स जिओने अधिक डेटा आणि कॉलिंग देणाऱ्या नव्या प्री-पेड प्लॅनची घोषणा केली आहे.

ही बातमी वाचली का? तुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल... 

रिलायन्स जिओने घरातून काम करणाऱ्यासांठी नव्या स्वस्त वार्षिक प्लॅनची घोषणा केली आहे. या प्री-पेड प्लॅनअंतर्गत 2399 रुपयांत वर्षभर दररोज 2 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे. त्याशिवाय सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि संदेश करण्याची सुविधा  असेल. त्यासोबत जिओ अॅप्स मिळणार आहेत. जिओने आणखी एक प्लॅन जाहीर केला आहे. वार्षिक 2121 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना दिवसाला 1.5 जीबी डेटा मिळे. त्यासोबत सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉल आणि एसएमएस करता येतील. या वार्षिक प्लॅनशिवाय रिलायंसचे डाटा ऑन पॅक उपलब्ध आहेत. या पॅकेजमध्ये केवळ डेटा वापरायला मिळतो. महत्वाचे म्हणजे कुठल्याही लिमीटशिवाय ग्राहकांना इंटरटनेट डाटा वापरता येतो. या अंतर्गत 151 रुपयात 30 जीबी, 201 रुपयात 40 जीबी तर 251 रुपयाच्या प्लॅनमध्ये 50 जीबी डाटा मिळेल.

ही बातमी वाचली का? हे असेल का प्रवीण परदेशी यांच्या बदलीचे कारण

अन्य पर्याय उपलब्ध 
रिलायन्सने डेटा ऑन पॅक आणले आहेत. त्यामध्ये केवळ डेटा वापरण्यास मिळतो. महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही मर्यादेशिवाय ग्राहकांना इंटरटनेट डेटा वापरता येतो. त्याअंतर्गत 151 रुपयांत 30 जीबी, 201 रुपयांत 40 जीबी आणि 251 रुपयांच्या प्लॅनमध्ये 50 जीबी डाटा मिळेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Working from home is easy; jio new pre-paid plan