तुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल...

कोरोनाविरोधी लढ्यात रस्त्यावर उतरून कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाचे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 8) कौतुक केले. दरम्यान, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना अवमानकारक वागणूक देऊ नका; शिक्षा करताना कायद्याचे भान ठेवा, असेही न्यायालयाने पोलिसांना सुनावले. 

तुमचं काम कौतुकास्पद, मात्र कायद्याचे भान ठेवा; उच्च न्यायालयाचे खडे बोल...

मुंबई : कोरोनाविरोधी लढ्यात रस्त्यावर उतरून कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिस दलाचे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी (ता. 8) कौतुक केले. दरम्यान, लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना अवमानकारक वागणूक देऊ नका; शिक्षा करताना कायद्याचे भान ठेवा, असेही न्यायालयाने पोलिसांना सुनावले. 

ही बातमी वाचली का? सीबीएसई दहावी, बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापुढे दाखल झालेल्या याचिकेवर शुक्रवारी न्या. रोहित देव यांच्यापुढे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. नागरिक संदीप नायर यांनी ऍड्‌. अनिल कमले यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. पोलिस लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना अवमानकारक व क्रूर शिक्षा देत आहेत. त्यामुळे मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे, असा आरोप याचिकादाराने केला आहे. 

ही बातमी वाचली का? दहावी, बारावीच्या निकालांबाबत मोठी बातमी; वाचा कधी लागणार निकाल...

उच्च न्यायालयाने या याचिकेची दखल घेतली आणि अनुचित शिक्षा करण्याच्या प्रकारांबाबत नाराजी व्यक्त केली. पोलिस विभाग नेटाने आणि धीराने काम करत आहे; त्यांच्यावरील ताण समजण्यासारखा आहे; परंतु लॉकडाऊन मोडणाऱ्यांवर कायद्याच्या कक्षेत बसणारी कारवाई करायला हवी. एखाद्याला हिणवणारी किंवा अवमान करणारी शिक्षा देता कामा नये. नागरिकांचे अधिकार आणि मानवी हक्कांचे उल्लंघन होता कामा नये, असे खडे बोल उच्च न्यायालयाने सुनावले. 

ही बातमी वाचली का? हे असेल का प्रवीण परदेशी यांच्या बदलीचे कारण

फलक आणि छायाचित्रे 
नागपूर येथे काही पोलिसांनी सकाळी चालण्यासाठी आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना अशोभनीय आणि मानवाधिकारांचे उल्लंघन करणारी शिक्षा दिली होती. "याने कायदाभंग केला आहे. हा देशाचा, कुटुंबाचा आणि मानवतेचा शत्रू आहे' असे लिहिलेले फलक त्यांच्या हातात दिले होते. त्यांची छायाचित्रे काढून प्रसार माध्यमांत प्रसिद्ध केली होती. त्यामुळे संबंधित महिला आणि ज्येष्ठ नागरिक अस्वस्थ झाले आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. या प्रकाराचा तपशील दाखल करण्याचे निर्देशही उच्च न्यायालयाने पोलिस आयुक्तांना दिले. 

Web Title: Work Police Admirable Be Aware Law Says High Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top