
मुंबईत दोन दशकांत नवीन HIV संसर्गामध्ये लक्षणीय घट
मुंबई : एकिकडे कोरोना काळात (corona) प्रवासाची सुविधा उपलब्ध होत नसल्याने एचआयव्ही रुग्ण (HIV Patients) एआरटी केंद्रापर्यंत (ART Center) पोहचू शकले नाहीत. मात्र, तरीही गेल्या 2 दशकांमध्ये (two decade) मुंबईत नवीन एचआयव्ही संसर्गामध्ये (New HIV infection decreases) लक्षणीय घट झाल्याचे जागतिक एड्स दिनानिमित्त (World AIDS Day) स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा: व्हाईस अॅडमिरल अजेंद्र बहादूर सिंह पश्चिम नौदल विभागाचे मुख्याधिकारी
पालिकेने नवीन एचआयव्ही रुग्णांमध्ये लक्षणीय घट नोंदवली आहे. मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटी (एमडॅक्स) कडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील एचआयव्ही ग्रस्त रुग्णांमध्ये घट झाली आहे. 2021-22 ऑक्टोबरपर्यंत 1659 (0.87 टक्के ) एचआयव्ही ग्रस्त रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर, 2020 ते 21 या कालावधीत 2063 (0.87 टक्के ) रुग्ण नोंदले गेले. मात्र, हीच संख्या 2019-20 मध्ये 4473(0.94 टक्के ) एवढी होती. 2021 मध्ये सापडलेल्या एकूण 1659 एचआयव्ही बाधित रुग्णांपैकी 1542 रुग्ण सध्या एआरीटी केंद्रांवर उपचार घेत आहेत.
2021-22 च्या ऑक्टोबरपर्यंत एकूण 1,90,691 एवढ्या चाचण्या करण्यात आल्या. तर, 2020-21 मध्ये 2,36,392 चाचण्या केल्या गेल्या. तर, कोविड पूर्व काळात 2019-20 मध्ये 4,75,540 एवढ्या चाचण्या केल्या गेल्या होत्या. त्यामुळे, 2020-21 आणि 2021-22 या कालावधीत चाचण्यांचे प्रमाणही कमी झाल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.
असुरक्षित संबंध एचआयव्हीसाठी कारणीभूत
दरम्यान, नव्याने निदान झालेल्या एचआयव्ही रुग्णांपैकी 77.4 टक्के रुग्ण हे 15 ते 49 वयोगटातील आहेत. तर, 33 टक्के महिलांचा यात समावेश आहे. तसेच, असुरक्षित संबंधामुळे एचआयव्ही होण्याचे प्रमाण अजूनही जास्त असून 94.6 टक्के लोकांना यातून संसर्ग झाला आहे. आईपासून बाळाला संसर्ग होण्याचे प्रमाण 2.4 टक्के एवढे आहे. 0.05 टक्के रुग्णांना संक्रमित रक्तामुळे संसर्ग झाला आहे. 0.2 टक्क्यांमध्ये संक्रमित सुई किंवा यंत्राचा वापर केल्याने संसर्गाची नोंद झाली आहे.
गर्भवतींच्या चाचण्यांचे प्रमाण घटले
कोविड काळात गर्भवतींच्या चाचण्यांचे प्रमाण घटल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. 2021-22 ऑक्टोबरपर्यंत फक्त 77834 गर्भवती महिलांची एचआयव्ही चाचणी केली गेली. त्यात 49 गर्भवती एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्या. तर, 2020-21 मध्ये 1,14,313 चाचण्या केल्या गेल्या. त्यात 90 महिला पॉझिटिव्ही आल्या. कोविड पूर्व काळात 2019-20 मध्ये 1,74,284 एवढ्या चाचण्या केल्या गेल्या. त्यात 144 पॉझिटिव्ह आल्या.
मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण सोसायटीच्या सहाय्यक प्रकल्प संचालक डॉ. श्रीकला आचार्य यांनी सांगितले की, कोविड असल्यामुळे चाचण्यांचे प्रमाण कमी दिसते. पण, एकूण गेल्या 2 दशकांमध्ये नवीन एचआयव्ही रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे. ही एक दिलासादायक बाब असून पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
Web Title: World Aids Day Update New Hiv Infection Decreases In Mumbai In Two Decade Hiv Patients
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..