esakal | 'या' प्रकल्पातील १००हून अधिक भूखंड 'म्हाडा' घेणार ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

Mhada

'या' प्रकल्पातील १००हून अधिक भूखंड 'म्हाडा' घेणार ताब्यात

sakal_logo
By
तेजस वाघमारे

मुंबई : म्हाडामार्फत (MHADA) जागतिक बँक (World Bank) प्रकल्पांतर्गत तीस वर्षांपूर्वी विविध संस्थांना वाटप केलेले निवासी भूखंड (Land) विनावापर पडून आहेत. या भूखंडावर रिझर्व्ह बँक (RBI) एअर इंडिया (Air India) सारख्या संस्थांनी कोणतेही बांधकाम केलेले नाही. भूखंड कचराकुंड्या बनल्या असल्याने नागरिकांनी केलेल्या तक्रारींनुसार (People Complaints) सुमारे 100 हून अधिक भूखंड म्हाडा ताब्यात घेणार आहे. यासाठी म्हाडा रिझर्व्ह बँक, एअर इंडियाला यासह भूखंड घेतलेल्या संस्थांना नोटीस (Notice) बजावणार असल्याचे मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्र्चना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी सांगितले. (World Bank Project Land takes Mhada Notice to RBI And Air India)

हेही वाचा: नशीला केक बनवणाऱ्यांच्या NCB ने आवळल्या मुसक्या, सायकोलॉजिस्टसह दोघे अटकेत

जागतिक बँकेच्या योजनेतून म्हाडाने 30 वर्षांपूर्वी काही संस्थांना चारकोप, गोराई या परिसरात भूखंड दिले. काही संस्थांनी भूखंडावर बांधकाम केले आहे. तर अनेक संस्थांनी भूखंड ताब्यात ठेवले आहेत. भूखंड विकसित न झाल्याने त्यावर अतिक्रमण झाले आहे तर काही भूखंड कचराकुंड्या बनल्या आहेत. याचा स्थानिक नागरिकांना त्रास होऊ लागल्याने म्हाडाकडे नागरिकांकडून तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार म्हाडाने असे अविकसित भूखंड ताब्यात घेण्याचे ठरवले आहे.

भूखंड घेऊन ते विकसित न करणाऱ्या संस्थांमध्ये रिझर्व्ह बँक, एअर इंडिया अशा नामांकित संस्था आहेत. या संस्थांना नोटीसा बजाविण्यात येणार आहेत. तसेच राज्य सरकारने या संस्थांना भूखंड वाटप करण्याचा निर्णय घेतल्याने भूखंडाचे वाटप रद्द करण्यासाठी म्हाडाला राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवावा लागेल, असेही घोसाळकर म्हणाले.

loading image