गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका 2.4 टक्क्यांनी वाढला

भाग्यश्री भुवड
Thursday, 28 January 2021

दिवसेंदिवस गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. या कर्करोगाची रुग्णसंख्या पाहता जगातील 20 टक्के रुग्ण हे केवळ भारतात आढळून येतात.

मुंबई: दिवसेंदिवस गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत चालले आहे. या कर्करोगाची रुग्णसंख्या पाहता जगातील 20 टक्के रुग्ण हे केवळ भारतात आढळून येतात. स्तनांच्या कर्करोगानंतरच्या स्त्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळणारा हा दुसऱ्या क्रमांकाचा कर्करोग आहे. 2020 मध्ये अशा प्रकारच्या कर्करोगामध्ये दर 10,00,000 महिलांमध्ये 22 नवीन प्रकरणांचे निदान झाले असून गर्भाशय मुखाचा कर्करोग होण्याचा धोका 2.4 टकक्यांनी वाढला आहे. चिंताजनक बाब म्हणजे अशाप्रकारचा कर्करोग हा 35 ते 45  वयोगटात आढळून येत आहे. शिवाय, तरुणींमध्येही या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे.

एशियन कॅन्सर इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आणि स्त्री कर्करोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र केरकर यांनी सांगितले की, हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) सारखे विषाणु, जननेंद्रियाची अस्वच्छता, कमी वयातील लैंगिक संबंध, एकापेक्षा अनेक पुरुषांसोबत असलेला लैगिक संबंध, असुरक्षित लैंगिक संबंध ही कारणे गर्भाशय मुखाच्या कर्करोगाला कारणीभूत ठरतात. वारंवार होणा-या एचपीव्ही संक्रमणाकडे दुर्लक्ष केल्यास पुढील 10 ते 15 वर्षांत त्याचे रुपांतर गर्भाशय मुखाच्या कर्करोगात होते. या कर्करोगाची नियमित तपासणी आणि लवकर निदान झाल्यास यातून बरे होण्याची शक्यता वाढते.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

डॉ. केरकर पुढे म्हणाले की, सर्व्ह्याकाल कॅन्सर न होण्यासाठी आता लसीकरण उपलब्ध आहे. तसेच आधुनिक स्क्रीनिंग तंत्रज्ञानांच्या मदतीने या रोगाचे निदान लवकर होऊ शकते. जर सर्व्हायकल कॅन्सरचे निदान वेळेत झाले, तर शस्त्रक्रिया, रेडियेशन थेरपी, केमोथेरपी या उपचारपद्धतींनी कर्करोग बरा होऊ शकतो. एकदा गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोगाचा विकास झाल्यानंतर, पहिल्या टप्प्यात रोगात रेडिओथेरपी आणि केमोथेरपीशिवाय किंवा त्याशिवाय शस्त्रक्रिया समाविष्ट केली जाते. उच्च टप्प्यात शस्त्रक्रिया उपयुक्त नसतात आणि रेडिओथेरपी आणि केमोथेरपीद्वारे सर्वोत्तम उपचार केले जातात.

हेही वाचा- मुंबई पालिकेच्या लसीकरणाचा पहिला टप्पा 14 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होणार?

हा कर्करोग टाळण्यासारखा

गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग सहजपणे टाळता येतो याची माहिती भारतातील बर्‍याच महिलांना नसते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, सर्व्हायकल कॅन्सर टाळता येण्यासाठी काही खबरदारी घेता येऊ शकते. सुरक्षित यौनसंबंध असणे गरजेचे आहे. पॅप स्मीयर नावाची चाचणी व्यापकपणे उपलब्ध असून 30 वर्षावरील महिलांनी दर तीन वर्षांनी ही चाचणी करणे आवश्यक आहे. निरोगी लैंगिक सवयी आणि नियमित पॅप चाचणी करण्याने गर्भाशयाच्या ग्रीवेचा कर्करोग रोखण्यासाठी फायदेशीर ठरते.

---------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

world cancer cases India alone accounts 20 percent


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: world cancer cases India alone accounts 20 percent