esakal | Mumbai : ‘हम्बोल्ट’ पेंग्विनची ऑनलाईन सफर जगभर!
sakal

बोलून बातमी शोधा

mumbai

‘हम्बोल्ट’ पेंग्विनची ऑनलाईन सफर जगभर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हम्बोल्ट पेंग्विनचा जन्मापासून आतापर्यंतचा प्रवास संपूर्ण जगाला पाहता येणार आहे. पेंग्विनवरील चित्रफीत तयार केली असून, प्राणिसंग्रहालयाच्या आभासी ‘व्हर्च्युअली वाईल्ड’ सफारीच्या निमित्ताने हा प्रवास पाहता येणार आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते या चित्रफितीचे अनावरण झाले.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयात १ ते ७ ऑक्टोबर या काळात वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने ‘हम्बोल्ट पेंग्विन एक यशस्वी प्रवास’ या भागात पेंग्विनच्या मुंबईत येण्यापासून आतापर्यंत केलेला यशस्वी प्रवास यात मांडला आहे. हम्बोल्ट पेंग्विनचे संगोपन कसे केले जाते? त्यांची काळजी कशी घेतली जाते? याबद्दलची संपूर्ण माहिती या चित्रफितीमध्ये दिली आहे. तसेच मे महिन्यात राणीच्या बागेत जन्मलेल्या ‘ओरिओ’ पेंग्विनचा जन्मापासून आतापर्यंतचा प्रवास या चित्रफितीत पाहता येणार आहे.

ऑक्टोबरमधील पहिल्या आठवड्यामध्ये प्राणिसंग्रहालयात ‘वन्यजीव सप्ताह’ साजरा करण्यात येतो; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालय बंद असल्यामुळे या वर्षी वन्यजीव सप्ताह ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. व्‍हर्च्‍युअल टूरद्वारे प्राणिसंग्रहालयातील वन्यप्राणी, पक्षी, तसेच परिसरातील झाडे, इतर जैवविविधता ऑनलाईन उपलब्ध करण्यात आली आहे. फेसबुक, ट्विटर, युट्यूब, इन्स्टाग्राम अशा सर्व समाजमाध्यमांवर @themumbaizoo या नावाने ही ध्वनिचित्रफीत सर्वांना पाहता येईल.

‘ओरिओ’चा वाढदिवस

१ मे रोजी जन्मलेल्या पेंग्विनचे नामकरण ‘ओरिओ’ असे करण्यात आले आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त या वेळी केक कापण्यात आला. पालिकेचे डॉक्टर पेंग्विनची ज्या पद्धतीने काळजी घेतात, ते सर्व या चित्रफितीत बघण्यासारखे असल्याचे महापौरांनी सांगितले.

loading image
go to top