
बदलापूर : नेपाळच्या काठमांडूत पार पडलेल्या जागतिक परिषदेत बदलापूरच्या 'देवाभाऊ' चष्म्यावर जगातील सर्वात स्वस्त चष्मा म्हणून शिक्कामोर्तब झाल आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच 'देवाभाऊ' चष्म्याच्या रूपात जगाला मोठी भेट मिळाली. या परिषदेत बदलापूरच्या व्हिजन फ्रेंड साकिब गोरे या सामाजिक संस्थेने सादर केलेला 33 रुपयांतील 'देवाभाऊ' चष्मा आता अमेरिकेसह 140 देशांमध्ये पोहोचणार आहे.