वरळी किल्ल्याचे जतन आणि सुशोभीकर होणार, तरुणांनाही मिळणार रोजगार

समीर सुर्वे
Monday, 5 October 2020

वांद्रे किल्ल्याच्या जतन आणि सुशोभीकरणापाठोपाठ वरळी किल्ल्याचे जतन आणि सुशोभीकरण देखील होणार आहे

मुंबई : वांद्रे किल्ल्याच्या जतन आणि सुशोभीकरणापाठोपाठ वरळी किल्ल्याचे जतन आणि सुशोभीकर देखील होणार आहे. यासाठी दिड कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. तर, किनाऱ्यावरील समुद्र पर्यटनालाही चालन देण्यासाठी वरळी ते वांद्रे अशी बोट सफारीही सुरु करण्याचा विचार सुरु आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी याबाबत राज्य सरकारचे पर्यटन विभाग, पुरातत्व विभाग आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

मुंबईच्या वैभवात भर घालू शकणाऱ्या वरळी किल्ल्याचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे.  जेट्टी तयार करुन वांद्रे ते वरळी किल्ला बोटसफरही सुरु करता येईल. यातून  निकांना  रोजगार देता येऊ शकेल, असेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

महत्त्वाची बातमी : डायबिटीसग्रस्तांची चिंता मिटणार, 'डायबेटिक फूट अल्‍सर'वर वोक्‍सहिल ठरतंय गुणकारी

वरळी येथील किल्ल्याचे जतन, संवर्धन करणे तसेच किल्ल्याचे सौंदर्यीकरण करणे, प्रकाश व्यवस्था करणे या, कामांसाठी दीड कोटी रुपयांंच्या खर्चाच प्रस्ताव देण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. महापालिका आणि राज्य पुरातत्व संचालनालयामार्फत ही कामे करण्यात येतील. यासंदर्भात पाठपुरावा करुन हा प्रस्ताव मान्य करणे तसेच त्याप्रमाणे किल्ला जतन, संवर्धन आणि सुशोभीकरणाची कामे करण्यात यावी, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या. 

या बैठकीस माजी राज्यमंत्री  सचिन अहीर, माजी आमदार  सुनिल शिंदे, नगरसेविका हेमांगी वरळीकर, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती वल्सा नायर–सिंह, पुरातत्व विभागाचे संचालक तेजस गर्गे, पर्यटन सहसंचालक डॉ. धनंजय सावळकर तसेच पालिकेचे प्रतिनिधी उपस्थीत होते.

( संकलन - सुमित बागुल ) 

Worli fort will be preserved and beautified youth will get jobs says aaditya thackeray

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worli fort will be preserved and beautified youth will get jobs says aaditya thackeray