Video : वरळी सी-लिंक वर जलपरी! गेट वे ऑफ इंडियापर्यंतचे 36 KM अंतर केलं 8 तास 46 मिनिटांत पूर्ण

तब्बल ३६ किमीचे अंतर ८ तास ४५ मिनिटे सलग पोहून पार केलं आहे.
Video Viral
Video Viral Sakal

मुंबई : मुंबईतील वरळी सी-लिंक ते गेट वे ऑफ इंडिया हे ३६ किलोमीटरचे अंतर अवघ्या ८ तास ४६ मिनिटांत पोहून पार केल्याचा पराक्रम सुचेता बर्मन या महिलेने केला आहे. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून सध्या या जुन्या पराक्रमाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सुचेता देव बर्मन यांनी हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. "Exploring 36 kms of Mumbai in my way" असं कॅप्शन टाकून त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्या पोहताना दिसत आहेत. Throwback असं या व्हिडिओवर लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे हा पराक्रम जुना असल्याची माहिती समोर आली आहे.

Video Viral
लहान मुलीने चिमुकल्याला उचलून टाकले विहिरीत; थरकाप उडवणारे CCTV Footage

दरम्यान, ही पोस्ट ४ ऑगस्ट रोजी इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आली आहे. मागच्या चार दिवसांत हा व्हिडिओ सहा लाखांपेक्षा अधिक युजर्सने पाहिला असून आत्तापर्यंत अडीच लाखांपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या व्हिडिओला आपली पसंती दर्शवली आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

"मुंबईच्या समुद्रातील पाणी पोहण्यासाठी योग्य नाही तरीही पोहून हे अंतर पार केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, महाराष्ट्र सरकारने त्यांना पोहण्यासाठी परवानगी दिली का?" अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com