esakal | किनारी मार्गासाठी तारीख पे तारीख, २0२३ अखेर प्रकल्प होणार पूर्ण?
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai sea side

किनारी मार्गासाठी तारीख पे तारीख, २0२३ अखेर प्रकल्प होणार पूर्ण?

sakal_logo
By
- समीर सुर्वे

मुंबई : वरळी ते नरीमन पॉईंट (worli to nariman Point) पर्यंतचा सागरी किनारी मार्ग (Sea Side Road) पूर्ण होण्याची प्रतिक्षा पुन्हा वाढली आहे. आता 2024 च्या लोकसभा निवडणुकी (Parliament Election) पूर्वीच या मार्गवरून वाहतुक सुरु होणार आहे. 2023 च्या अखेरपर्यंत या मार्गाचे बांधकाम पुर्ण होणार आहे. सागरी किनारी मार्गाच्या बांधकामासाठी (Road Construction) 2018 मध्ये कार्याध्येश देण्यात आले होते. हा 10.58 किलोमिटरचा मार्ग 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षीत होते. मात्र,काम सुरु झाल्यानंतर न्यायालयात (court) दाखल होणाऱ्या याचिकांमुळे बांधकाम थांबत होते. त्यानंतर जुलै 2023 पर्यंत बांधकाम पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला. मधल्या काळात कोविडच्या लॉकडाऊनमुळे (Covid Lockdown) कामात अडथळे येऊ लागल्याने बांधकामाचा 2023 च्या अखेर पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ( Worli to Nariman sea side road may completes before parliamentary elections)

हेही वाचा: मुंबई महापालिका प्रशासना विरोधात मासे विक्रेत्यांचा एल्गार!

आत्तापर्यंत प्रकल्पाचे 36 टक्के काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे काम 2023 च्या अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षीत आहे. असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. कोविड काळात कामगारांचे स्थालांतर झालेल्या कामाच्या वेगावर परीणाम झाला होता. त्यामुळे कंत्राटदारांनी पालिकेकडे मुदतवाढही मागितली हाेती.

100 हेक्टर भरणी पूर्ण

या प्रकल्पासाठी सुरवातील 90 हेक्टर समुद्र किनाऱ्यावर भरणी करण्यात येणार हाेती. मात्र,नंतर 110 हेक्टर किनाऱ्यांवर भरणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आतापर्यंत 100 हेक्टर भरणी पूर्ण झाली आहे. असेही पालिकेकडून सांगण्यात आले.

loading image