वाह क्या बात है! साडेपाच वर्षीय हर्षितीची वर्ल्ड बुक ऑफमध्ये नोंद; वाचा ते खास कारण

महेश भोईर
Wednesday, 9 September 2020

उरण तालुक्यातील भेंडखळ येथील हर्षिती कविराज भोईर हिने वयाच्या साडेपाच वर्षी  26 जानेवारी रोजी अवघ्या 12 तासांत महाराष्ट्रातील तब्बल पाच किल्ले सर करून वर्ल्ड बुक ऑफ रेकार्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.

उरण : उरण तालुक्यातील भेंडखळ येथील हर्षिती कविराज भोईर हिने वयाच्या साडेपाच वर्षी  26 जानेवारी रोजी अवघ्या 12 तासांत महाराष्ट्रातील तब्बल पाच किल्ले सर करून वर्ल्ड बुक ऑफ रेकार्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. त्यामुळे तिचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

मराठा आरक्षणाबाबत नारायण राणे यांचा सरकारवर हल्ला; नात्यातले दोन वकील नेमल्याचा आरोप

साडेतीन वर्षांची असताना हर्षितीने आई-वडिलांसोबत ट्रेकची सुरुवात केली. 8 जून 2019 रोजी महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर म्हणून ओळखला जाणारा कळसूबाई शिखर सर करून आपलं नाव तिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड तसेच आशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविले. आपल्या बालवयात तिने आजपर्यंत 24 ते 25 ट्रेक केले आहेत. 26 जानेवारी 2020 रोजी तर तिने 12 तासांत महाराष्ट्रातील तब्बल पाच (श्रीवर्धन गड, मनरंजन, लोहगड, विसापूर, आणि तिकोना) किल्ले सर करून आपले नाव वर्ल्ड बुक ऑफमध्ये आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड; तसेच इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे. तिने आणि तिच्या आई-वडिलांनी घेतलेल्या मेहनतीमुळे हे यश प्राप्त झाले आहे.

 

मला अभिमान वाटतो की, आज माझ्या मुलीने घेतलेल्या मेहनतीने तिचे वर्ल्ड बुक ऑफ रेकार्डमध्ये नाव नोंदले गेले आहे. या यशामुळे उरण तालुक्यासह रायगड जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
- कविराज भोईर,
हर्षितीचे वडील

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wow what a thing! Five and a half year old Harshitis entry in the World Book Off; Read that special reason