उत्तरांमध्ये दिलेल्या चुकीच्या पर्यायांचे गुण विद्यार्थांना मिळणार, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा होणार फायदा

तेजस वाघमारे
Thursday, 19 November 2020

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेत काही प्रश्न चुकीचे देण्यात आले होते

मुंबई, ता. 19 : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात आलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेत काही प्रश्न चुकीचे देण्यात आले होते. विविध शिफ्टमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये उत्तरांच्या पर्यायांमध्ये तांत्रिक 23 चुका आढळल्या आहेत. या चुकांचे गुण विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. याचा लाभ चुकीचे पर्याय देण्यात आलेल्या शिफ्टमधील विद्यार्थाना होणार आहे. यासंदर्भात सीईटी सेलने हरकती आणि त्यावर घेतेलल्या निर्णयाचे परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.

सीईटी सेलने ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यभरात सीईटी परीक्षा सुमारे 200 केंद्रांवर घेतली. ही परीक्षा पीसीबी गटासाठी 16 शिप्ट आणि पीसीएम गटासाठी 14 अशी 32 शिप्टमध्ये घेण्यात आली. राज्यभरातून 5 लाख 42 हजार 905 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी  3 लाख 83 हजार 736 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. कोरोनाच्या प्रादुर्भावच्या काळात सीईटी सेलने नियोजन करुन ही परीक्षा यशस्वीपणे पार पडली.

महत्त्वाची बातमी : विज बिल माफी : विरोधकांची दखल न घेण्याचे सरकारचे धोरण

या परीक्षेसंदर्भात हरकती नोंदवण्याचे आवाहन केल्यानंतर सुमारे 791 विद्यार्थ्यांनी विविध हरकती नोंदवल्या होत्या. त्यापैकी सीईटी सेलने 65 हरकती बरोबर होत्या. त्या पैकी उत्तरांचा पर्याय देताना काही चुका झाल्यामुळे ज्या शिप्टमध्ये विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. 

ज्या प्रश्नाच्या पर्यायात चुक आढळली आहे किंवा तांत्रिक चुका झाल्या आहेत अशा विद्यार्थ्यांना 65 हरकतीमधील 23 हरकतीनुसार पुर्ण गुण दिले जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक पात्र झालेल्या हरकतीमधील जीवशास्त्र विषयासाठी 35, गणितसाठी 5, रसायनशास्त्र 12 आणि भौतिकशास्त्रसाठी 13 अशा हरकती दाखल झाल्या होत्या, अशी माहिती सीईटीसेलने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

( संपादन - सुमित बागुल )

wrong options in CET exams CET cell has decided to give marks to the students for faulty answers


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: wrong options in CET exams CET cell has decided to give marks to the students for faulty answers