
मुंबईत आढळला कोरानाचा XE रूग्ण; BMC ची माहिती
मुंबई : मुंबईत शनिवारी कोरोना व्हायरसच्या XE प्रकाराच्या व्हेरिएंटची (Corona XE Variant) लागण झालेल्या रूग्णांची पुष्टी झाल्याची नोंद झाली आहे, अशी माहिती, बीएमसीने (BMC) दिली आहे. सांताक्रूझ (SantaCruz) उपनगरातील रहिवासी असलेल्या 67 वर्षीय आणि पूर्ण लसीकरण झालेल्या पुरुषाला याची लागण झाल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, आढळून आलेला व्हेरिएंट यापूर्वी आढळून आलेल्या ओमिक्रॉनपेक्षा (Omicron) 10 पट जास्त संक्रमणक्षम असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटले आहे. (XE variant Of Coronavirus Confirmed In Mumbai)
हेही वाचा: Maharashtra Kesari : कोण आहे मानाची गदा मिळवणारा पृथ्वीराज पाटील
बीएमसीने दिलेल्या माहितीनुसार, XE व्हेरिएंटची लागण झालेली व्यक्ती 11 मार्च रोजी वडोदरा (Vadodara) येथे गेली होती. त्यावेळी एका हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान संबंधित व्यक्तीची प्रकृती खालावली. त्यानंतर त्याची कोरोना टेस्ट (Corona Test) केली असता ती पॉझिटिव्ह आली. मात्र, लक्षणे दिसत नसल्याने ही व्यक्ती मुंबईला परतली. मात्र, ज्यावेळी संबंधित व्यक्तीच्या नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग (Genome sequencing) केले गेले तेव्हा या व्यक्तीला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट XE ची लागण झाल्याचे समोर आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे या व्यक्तीचे संपूर्ण लसीकरण (Corona Vaccination) झालेले असून, त्याला कोणत्याही प्रकारची गंभीर लक्षण दिसून येत नसून संबंधित व्यक्ती पूर्णपणे स्थिर असल्याचे बीएमसीने सांगितले आहे.
Web Title: Xe Variant Of Coronavirus Confirmed In Mumbai Says Civic Body Bmc
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..