बारावीचा अभ्यासक्रम बदलणार; पाहा काय असेल बदल...

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 मार्च 2020

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ पासून बारावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार चालू शैक्षणिक वर्ष हे बारावीच्या जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष असणार आहे.

मुंबई : राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने शैक्षणिक वर्ष २०२०-२०२१ पासून बारावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार चालू शैक्षणिक वर्ष हे बारावीच्या जुन्या अभ्यासक्रमाचे शेवटचे वर्ष असणार आहे. या निर्णयाची पुस्तक विक्रेते, शैक्षणिक संस्थांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पाठ्यपुस्तक मंडळाने केले आहे.

ही बातमी वाचली का? कोरोनाच्या भीतीमुळे अर्नाळा किनाऱ्यावर शुकशुकाट

राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने नव्या अभ्यासक्रमाची घोषणा यापूर्वीच केली आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांना सध्या शिकविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमाचे हे शेवटचे वर्ष असणार आहे. २०२०-२०२१ शैक्षणिक वर्षापासून बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात उपलब्ध असतील. जून २०२० मध्ये ही नवीन पुस्तके प्रकाशित करण्यात येणार आहेत. 

ही बातमी वाचली का? पन्नास वर्षे बाबांनी महाराष्ट्र जपला- सुप्रिया सुळे

पुस्तकांशिवाय गैरसोय
सध्या दहावी-बारावीची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे शिक्षकांना मंडळामार्फत एप्रिल महिन्यात नवीन अभ्यासक्रमाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र, पुस्तके मे महिन्यापूर्वी बाजारात न आल्यास खासगी शिकवणी चालकांची मोठी गैरसोय होऊ शकते. तसेच बारावीच्या वर्गात जाणाऱ्या विद्यार्थ्यांनाही पुस्तकांची वाट पाहत बसावे लागण्याची शक्‍यताही शिक्षक व्यक्त करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The XII syllabus will change from next year maharashtra