esakal | कोरोनाच्या भीतीमुळे अर्नाळा किनाऱ्यावर शुकशुकाट
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या भीतीमुळे अर्नाळा किनाऱ्यावर शुकशुकाट

कोरोना व्हायरसचा वसई-विरारमधील पर्यटनाला फटका बसला आहे. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातात; पण कोरोनाच्या भीतीने समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट दिसत आहे.

कोरोनाच्या भीतीमुळे अर्नाळा किनाऱ्यावर शुकशुकाट

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नालासोपारा : कोरोना व्हायरसचा वसई-विरारमधील पर्यटनाला फटका बसला आहे. शनिवार, रविवार या सुटीच्या दिवशी समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून जातात; पण कोरोनाच्या भीतीने समुद्रकिनाऱ्यावर शुकशुकाट दिसत आहे. समुद्रकिनाऱ्यावर तर पर्यटकच नसल्याने तेथील हॉटेल व्यावसायिकही चिंतेत दिसत होते.

ही बातमी वाचली का? ठाण्यात-पोलिस रिक्षाचालक वाद

अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर मुंबई, ठाणे, भिवंडीसह संपूर्ण पालघर जिल्ह्यातील हजारो पर्यटक या समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी येतात. शनिवार-रविवारी हजारो पर्यटकांनी फुलून जातो; मात्र मागच्या काही दिवसांपासून कोरोनाच्या भीतीने पर्यटकांनीसुद्धा पाठ फिरवल्याने शुकशुकाट जाणवत आहे. पर्यटकांची उंट सवारी करणारे उंटवालेसुद्धा बसूनच पर्यटकांची वाट पाहत आहेत. दिवसाला हजार ते बाराशे रुपये कमावत असताना आता केवळ २०० ते ३००  रुपये कमाई होत असल्याचे उंटचालक विजय यादव यांनी सांगितले.

ही बातमी वाचली का? गरिबांचा पुरणपोळीचा घास हिरावला

विरार, वसई, नालासोपारा परिसरातील अर्नाळा, कळंब, राजोडी, सुरुची बाग, पाचू बंदर, किल्लाबंदर या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी असते. पर्यटकांच्या गर्दीमुळे तेथील छोट्या-मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचा उदरनिर्वाह चालतो; पण कोरोनाच्या भीतीने पर्यटकांची संख्याच कमी झाली आहे. 

ही बातमी वाचली का? परदेशवारी केलेल्यांवर 14 दिवस देखरेख

धंद्यावर परिणाम
समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांना येथील मच्छी, मटण हे आवडते; पण कोरोनाच्या भीतीने पर्यटक मटण-मच्छी खात नाहीत. त्यामुळे धंद्यावर परिणाम झाल्याचे हॉटेल व्यावसायिक भरत भोईर, प्रतिभा भोईर, भरत बावखळे यांनी सांगितले. 
 

loading image