Mumbai News: दक्षिण मुंबईत बिझनेस हब विकसित करणार, यामिनी जाधवांचा निवडणूक अजेंडा

yamini jadhav
yamini jadhav sakal

मुंबई, ता. ४ - दक्षिण मुंबई येथे मोठ्या बॅका आणि कार्पोरेट कार्यालये आहेत. व्यापारी आणि व्यावसायिक केद्रे आहेत. पुरातन खात्याचा इमारती आहेत. येथून मोठी आर्थिक उलाढाल होते. त्यामुळे येथे बिझिनेस हब विकसित करणे हा आपला या निवडणुकीचा अजेंडा असल्याचे दक्षिण मुंबईच्या शिवसेनेच्या उमेदवार यामिनी जाधव यांनी स्पष्ट केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने आज दक्षिण मुंबई लोकसभा मतदार सघाच्या उमेदवार यामिनी जाधव यांचा वार्तालार कार्यक्रम झाला. यावेळी त्या बोलत होत्या त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही कौतूक केले. त्या म्हणाल्या, खरेतर पंतप्रधान नरेंद मोदी यांनी ४०० पार चा संकल्प सोडला आहे. त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी ही जागा जिंकायचीच असा माझा आणि महायुतीच्या घटक पक्षांचा निर्धार आहे. त्या दृष्टीने अर्ज दाखल करताच प्रचार सुरू केला आहे.

सर्वांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेणार

महिलांना चांगल्या सुविधा देणे याला माझे प्राधान्य राहिल असे स्पष्ट करून त्या जाधव म्हणाल्या की, या मतदार संघात म्हाडाच्या वसाहती मोठ्या संख्येने आलेत. बीबीडी चाळींच्या पूनर्विकास पोर्ट ट्रस्टच्या जमीनीवरील वसाहतींना सेवा सुविधा मिळत नाहीत. त्यांच्या अधिका-यांसोबत बैठक घेवून त्यांचा प्रश्न सोडविण्यास आहे. पोलीस वसाहतींचा पूनर्विकास तसेच समुह विकासाची भुमिका घेवून आता काम करावे लागेत. मला सर्व समाज घटकांचा पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांच्या मागण्या आहेत. सर्व समाजघटकांचा विचार करून त्यांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा माझा प्रयत्न राहिल अशी भुमिका त्यांनी मांडली.

बिझिनेस हबवा बळकटी

खरेतर हा मतदार संघ बिझनेस हब आहे. येथून मोठी आर्थिक उलाढाल होते. राज्याच्या आर्थिक राजधानीचे हे शहर आहे. त्यामुळे येथे अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी बिझीनेस हब अधिक बळकर करण्यासाठी आपला प्रयत्न राहिल असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबईचा विकास दिसू लागला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबईच्या विकासासाठी कौतूक केले. मुंबईचा ख-या अर्थाने विकास त्यांनी घडवून आणला आहे. कोरोना योद्यांना स्वच्छता दूत म्हणून त्यांनी पालिकेच्या सेवेत घेतले आहे. मलनिसारण प्रकल्प त्यांनी मार्गी लावसा आहे. मुंबई खड्डे मुक्त करण्यासाठी त्यांनी सीसी रोड करण्याचा प्रयत्न केला आहे. मुंबईचा विकास दिसून लागला असल्याचे त्या म्हणाल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com