मन सुन्न होईल ! मुलगा आयलंडमध्ये, इथे बाबा वारले; शेवटी उरला 'हा' एकाच पर्याय, आता बाराव्या साठी तरी...

अनिश पाटील
Tuesday, 21 April 2020

लॉकडाऊनमुळे भारतात परतता आले नाही भारतात...

मुंबई, ता.21 : लॉकडाऊनमुळे अनेकजण कुटुंबापासून दूर अडकले असताना परळमधील 20 वर्षीय मुलाने व्हिडिओ कॉलद्वारे आपल्या वडिलांचे अत्यंदर्शन घेतले. शिक्षणासाठी आयलंड येथे हा मुलगा अडकून पडला आहे.

यश मेहता हा सध्या आयलंड येथील डब्लिन येथील बिझनेस स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. यशचे वडिल कमलेश मेहता (47) यांचा हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झाला. त्याने वडिलांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी भारतीय वकिलाती, पंतप्रधान कार्यलय, परराष्ट्र मंत्रालय यांच्याकडे ट्वीटरद्वारे मदत मागितली. अखेर त्याने पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडेही ट्वीटरद्वारे मदत मागितली.

रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी, एक दिलासादायक बातमी 

आदित्य ठाकरे यांनी त्यावर तात्काळ रिप्लाय देत तुझ्या वडिलांचे ऐकून फार दुख झाले. स्थानिक पातळीवर तुझ्या कुटुंबाला काही मदत हवी, असेल, तर नक्की केली जाईल. तुझ्या परतीच्या प्रवासाबाबत राज्यस्तरावर निर्णय घेता येणार नाही. त्यासाठी मी तुझा हा संदेश परराष्ट्र मंत्रालयाला टॅग करत असून तेच तुला तात्काळ मदत करू शकतील, असल्याच्या आशयाचा संदेस आदित्य ठाकरे यांनी केला.

नवी डोकेदुखी; राज्यात कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्याच रुग्णांची संख्या आहे...

यश यांच्या वडिलांचे झवेरी बाजार येथे सराफाचे दुकान आहे. यशच्या वडिलांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता. सध्या त्यांची तब्येत व्यवस्थित होती. 18 एप्रिलला त्याच्या वडिलांना अचानक त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना तात्काळ ग्लोबल रुग्णालयात नेण्यात आले. तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. दुर्दवाने यशला वडिलाच्या अंत्यविधीसाठी उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे त्याने व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचे अंत्यदर्शन घेतले. पण वडिलांच्या 12 दिवशी करण्या येणा-या विधीसाठी उपस्थित रहायचे आहे. त्यासाठी त्याने परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे.

yash from dublin writes to aaditya thackeray after sad demise of his father in mumbai


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: yash from dublin writes to aaditya thackeray after sad demise of his father in mumbai