यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर 

यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर 

डॉ. हमीद दाभोलकर, अच्युत गोडबोले, डॉ. श्रीपाद सबनीस 
शफाअत खान, प्रा. अनिल सोनार, अशोक राणे यांना 

मुंबई  : नाटककार शफाअत खान, लेखक प्रा. अनिल सोनार, अशोक राणे, डॉ. हमीद दाभोलकर, अच्युत गोडबोले, डॉ. श्रीपाद सबनीस यांना 2019 या वर्षामधील उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीसाठी यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. शफाअत खान यांची नाट्यकलाकृती "गांधी आडवा येतो', प्रा. अनिल सोनार यांचे "गजल मिस्कली', अशोक राणे यांचे "सिनेमा पाहणारा माणूस', हमीद दाभोळकर यांचे "विवेकाच्या वाटेवर', डॉ. श्रीपाद सबनिस यांचे "आदिवासी प्रतिभावंतांचे मराठी साहित्य' व अच्युत गोडबाले यांचे "अनर्थ विकासनिती : सर्वनाशाच्या उंबरठ्यावर?' या साहित्यकृतींचा यानिमित्ताने सन्मान करण्यात येणार आहे. 
कोव्हिडच्या पार्श्वभूमीवर यावर्षी स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र साहित्यिकांना थेट घरपोच प्रदान करण्यात येणार आहे. पारितोषिकाची रक्कम त्यांच्या बॅंक खात्यावर थेट हस्तांतरित करण्यात येईल. यंदा 'प्रथम प्रकाशन समीक्षा सौंदर्यशास्त्र' या वाङ्मय प्रकारामध्ये परीक्षकांनी पुरस्कारसाठी एकाही पुस्तकाची शिफारस केलेली नाही. 


1. प्रौढ वाङ्मय पुरस्कार विजेते 

विभाग - लेखक - साहित्यकृती 
कवी केशवसूत पुरस्कार (काव्य) -मंगेश काळे -मायावीये तहरीर (पोएट्रीवाला पेपरवॉल मीडिया ×ण्ड पब्लिशिंग) 
राम गणेश गडकरी पुरस्कार (नाटक/एकांकिका)- शफाअत खान -गांधी आडवा येतो (पॉप्युलर प्रकाशन) 
हरी नारायण आपटे पुरस्कार (कांदबरी) -मनोज बोरगावकर -नदीष्ट (ग्रंथाली) 
दिवाकर कृष्ण पुरस्कार (लघुकथा) - धर्मराज निमसरकर -हुंदक्‍यांची काहिली(दिलीपराज प्रकाशन) 
अनंत काणेकर पुरस्कार (ललितगद्य) -नयना सहस्त्रबुद्धे- स्त्रीभान(अमेय प्रकाशन, पुणे) 
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार (विनोद) - प्रा.अनिल सोनार-गझल मिस्किली(रजत प्रकाशन, औरंगाबाद) 
न.चिं.केळकर पुरस्कार (चरित्र) - अनीता पाटील -सूर्यकोटि समप्रभ द्रष्टा अणुयात्रिक डॉ. अनिल काकोडकर (मनोविकास प्रकाशन, पुणे) 
लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार (आत्मचरित्र) - अशोक राणे-सिनेमा पाहणारा माणूस(संधिकाल प्रकाशन, भाईंदर) 
श्री. के. क्षीरसागर पुरस्कार(समीक्षा/ वाङ्मयीन संशोधन/सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन) - नीलिमा गुंडी -गतकाळाची गाज (मौज प्रकाशन गृह, मुंबई) 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार (राज्यशास्त्र/समाजशास्त्र) -डॉ. हमीद दाभोलकर -विवेकाच्या वाटेवर (राजहंस प्रकाशन, पुणे) 
शाहू महाराज पुरस्कार (इतिहास) - गोपाळ चिप्पलकट्टी - प्राचीन भारतीय संस्कृती: मूलाधारांच्या शोधात(सदामंगल पब्लिकेशन, मुंबई) 
नरहर कुरूंदकर पुरस्कार (भाषाशास्त्र/व्याकरण) -खंडेराव कुलकर्णी-मराठी व्याकरण : स्वरूप व चिकित्सा (पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 
महात्मा ज्योतिराव फुले पुरस्कार (विज्ञान व तंत्रज्ञान) -डॉ.व्ही.एन.शिंदे-आवर्त सारणी व मूलद्रव्यांची दुनिया(अक्षर दालन, कोल्हापूर) 
वसंतराव नाईक पुरस्कार (शेती) -रमेश जाधव -पोशिंद्याचे आख्यान एक प्रश्नोपनिषद (साधना प्रकाशन, पुणे) 
(उपेक्षितांचे साहित्य) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार - डॉ. श्रीपाल सबनीस-आदिवासी प्रतिभावंतांचे मराठी साहित्य(दिलीपराज प्रकाशन, पुणे) 
सी.डी. देशमुख पुरस्कार (अर्थशास्त्र) -डॉ. गुरूदास नूलकर- अनर्थशास्त्र अर्थशास्त्र पर्यावरण आणि विषमता(मनोविकास प्रकाशन,पुणे) 
ना.गो. नांदापूरकर पुरस्कार (तत्त्वज्ञान व मानसशास्त्र) - मनीषा बाठे -रामदासी मोक्षपट आणि वारकरी मोक्षपट एक तौलनिक मागोवा(समर्थ मिडिया सेंटर, पुणे) 
कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार (शिक्षणशास्त्र) -परेश जयश्री मनोहर व संतोष शेंडकर -शिक्षणकोंडी (रोहन प्रकाशन, पुणे) 
डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार (पर्यावरण) - अच्युत गोडबोले - अनर्थ विकासनीती : सर्वनाशाच्या उंबरठयावर ? (मनोविकास प्रकाशन, पुणे) 
रा.ना.चव्हाण पुरस्कार (संपादित/ आधारित) -संपादक श्‍याम माधव धोंड- कवी अनिल यांची संपूर्ण कविता(विजय प्रकाशन, नागपूर) 
तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार (अनुवादित)-अनुवादक माधव वझे- प्रायोगिक रंगभूमी : तीन अंक(राजहंस प्रकाशन) 
भाई माधवराव बागल पुरस्कार (संकीर्ण क्रीडासह) - डॉ. सुरेश हावरे -शिदोरी (राजहंस प्रकाशन) 


2. प्रथम प्रकाशन 
बहिणाबाई चौधरी पुरस्कार (काव्य) - संदीप शिवाजीराव जगदाळे - असो आता चाड (लोकवाङ्मय गृह, मुंबई) 
विजय तेंडूलकर पुरस्कार (नाटक/एकांकिका) - अनुप जत्राटकर -निष्पर्ण पिंपळाच्या छायेत (तेजस पब्लिकेशन, कोल्हापूर) 
श्री.ना.पेंडसे पुरस्कार(कादंबरी) - ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर- यसन(स्वयंदीप प्रकाशन, पुणे) 
ग.ल.ठोकळ पुरस्कार(लघुकथा) -डॉ. विजय जाधव -अस्वस्थ तांडा (ग्रंथाली, मुंबई) 
ताराबाई शिंदे पुरस्कार (ललितगद्य) - डॉ. ऐश्वर्या रेवडकर -बिजापूर डायरी (साधना प्रकाशन, पुणे) 
रा.भा.पाटणकर पुरस्कार(समीक्षा सौंदर्यशास्त्र) - शिफारस नाही 

3. बालवाङ्मय पुरस्कार 
बालकवी पुरस्कार -विलास मोरे - शाळेला सुट्टी लागली रे (दिलीपराज प्रकाशन, पुणे) 
भा.रा. भागवत पुरस्कार(नाटक व एकांकिका)- सुनंदा गोरे - नवी प्रतिज्ञा(गोदा प्रकाशन, औरंगाबाद) 
साने गुरूजी पुरस्कार(कादंबरी) - बबन मिंडे -दौलतबंकी आणि त्याचा खजिना (राजहंस प्रकाशन, पुणे) 
राजा मंगळवेढेकर पुरस्कार (कथा) - स्वाती राजे- शोध(रोहन प्रकाशन, पुणे) 
यदुनाथ थत्ते पुरस्कार(सर्वसामान्य ज्ञान) - विजय तांबे -बबडू बॅंकेत (रोहन प्रकाशन, पुणे) 
ना.धो. ताम्हणकर पुरस्कार(संकीर्ण) -आशा बोकील -अनंत तिची ध्येयासक्ती : बचेंद्रीपाल 

4. सरफोजीराजे भोसले बृहन्महाराष्ट्र पुरस्कार 
सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार - दिती बर्वे- सौदीतले दिवस(पद्मगंधा प्रकाशन, पुणे) 

Yashwantrao Chavan State Literary Award 2021 announced

---------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com