यंदाची ग्रीन दिवाळी, मुंबईत ध्वनी प्रदूषणाचा सर्वात निच्चांक

यंदाची ग्रीन दिवाळी, मुंबईत ध्वनी प्रदूषणाचा सर्वात निच्चांक

मुंबई: मुंबईतील यंदाची दिवाळी ही ग्रीन दिवाळी ठरली आहे. कोरोनामुळे मागील 15 वर्षातील सर्वात निच्चांकी ध्वनी प्रदूषण नोंदवलं गेलं. यंदाच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभुमीवर हवा प्रदूषण रोखण्याच्या हेतूने मुंबई महापालिकेने सार्वजनिक ठिकाणी फटाके उडवण्यास प्रतिबंध केला होता. त्याचाच परिणाम म्हणून यंदा फटाक्यांच्या आवाजाने होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाची सर्वात कमी झाल्याची नोंद झाली आहे.

मुंबईत दिवाळी आणि फटाके हे जणू समीकरणच बनलं आहे. यानिमित्त शहरात सगळीकडेच मोठ्या प्रमाणावर फटाके फोडले जातात. फटाक्यांसोबत दरवर्षी ध्वनी तसेच वायु प्रदूषण वाढतं. आवाज फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाचा अहवाल तयार केला आहे. यंदाच्या दिवाळीत मुंबई महापालिकेने फटाके उजवण्याबाबत कडक निर्बंध घातल्याने कमी डेसीबलची नोंद झाली. त्याचबरोबर नागरिकांमध्ये ध्वनी प्रदूषणाबाबत जागृती होत असल्याचे ही नोंदवले आहे. आवाज फाऊंडेशनने शनिवारी लक्ष्मी पुजनाच्या दिवशी रात्री 8 ते 10 या वेळेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी सकाळपर्यंतच्या दिवाळीच्या तिनही दिवसांची शहरातील आवाजाची पातळी मोजून हा अहवाल बनवला आहे.

मुंबईत शक्यतो रात्री फटाके फोडले जातात. फटाके वाजण्याच्या वेळ मर्यादेपर्यंत म्हणजेच रात्री 10 वाजेपर्यंत शहरातील शांतता क्षेत्र असलेल्या शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात 105.5 डेसिबल ध्वनीची नोंद झाली. यापूर्वी मुंबईत दिवाळीच्या दिवशी 2019 मध्ये याची 112.3 डेसिबल.2018 मध्ये 114.1 डेसिबल, 2017 मध्ये 117.8 डेसिबल, ध्वनीची नोंद झाली होती.

लोकांमध्ये कोरोनाच्या निमित्ताने सरकारने केलेल्या आवाहनामुळे चांगली जनजागृती झाल्याचे दिसले. त्यामुळे शहरात यंदा कमी फटाके फुटले तसेच ध्वनी प्रदूषण ही कमी झाले. असे असले तरी दुसरीकडे मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 2010 पासून फटाके फोडण्यास बंदी असलेल्या शिवाजी पार्कात मात्र यावेळी फटाके फोडण्यात आले. अनेक लोकं मास्क न घालता वावरत होती तर अनेकांनी सामाजिक अंतर ठेवण्याकडे ही दुर्लक्ष केल्याचे दिसले. याबाबत आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कळवले असल्याचे आवाज फाऊंडेशनच्या प्रमुख सुमैरा अब्दुल अली यांनी सांगितले.

विभाग     पीएम 5 पीएम 10
     
सांताक्रूझ  88 102
वांद्रे तलाव 75 85
माहिम 253 177
शिवाजी पार्क 251 291
विले पार्ले 173 200

--------------------

(संपादन- पूजा विचारे)

This year Green Diwali is lowest in Mumbai for noise pollution

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com