esakal | यंदाच्या दिवाळीत पशु-पक्ष्यांनी घेतला मोकळा श्वास, जखमी होण्याच्या संख्येत घट
sakal

बोलून बातमी शोधा

यंदाच्या दिवाळीत पशु-पक्ष्यांनी घेतला मोकळा श्वास, जखमी होण्याच्या संख्येत घट

दरवर्षी साधारणत: रॉ , सर्प आणि पॉज मुंबई या तीनही  प्राणी मित्र संघटनांना 70  हून अधिक प्राणी आणि  पक्षी जखमी अवस्थेत सापडतात. मात्र यंदा रॉ संस्थेला केवळ एक घार जखमी अवस्थेत सापडली आहे.

यंदाच्या दिवाळीत पशु-पक्ष्यांनी घेतला मोकळा श्वास, जखमी होण्याच्या संख्येत घट

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई: दरवर्षी दिवाळीच्या फटाक्यांमुळे पशु पक्षी जखमी होणे, तसेच धुरामुळे श्वास कोंडून जमिनीवर कोसळणाऱ्या पक्षांची संख्या घटली आहे. दरवर्षी साधारणत: रॉ , सर्प आणि पॉज मुंबई या तीनही  प्राणी मित्र संघटनांना 70  हून अधिक प्राणी आणि  पक्षी जखमी अवस्थेत सापडतात. मात्र यंदा रॉ संस्थेला केवळ एक घार जखमी अवस्थेत सापडली आहे. तर पॉज मुंबई आणि सर्प संस्थेला एकाही जखमी प्राणी किंवा पक्षासाठी कॉल आला नसल्याने काही वर्ष सतत होणाऱ्या जनजागृतीमुळे लोकांमध्ये जनजागृती झाली असल्याचे दिसते.

दिवाळीजवळ येताच फटाक्यांची आताषबाजी सुरू होते. दिवाळीच्या दिवसात प्रामुख्याने फुलबाजा, पाऊस यांसह रॉकेट उडवली जातात. यंदा सरकारी निर्बंधामुळे दरवर्षीच्या तुलनेत फटाके वाजविण्याचे प्रमाण फार कमी होते. त्यामुळे फटाक्यांमधून निर्माण होणाऱ्या धुराचे प्रमाणही घटल्यामुळे दरवर्षी श्वास घेण्यास अडचणी आल्याने अनेक पक्षी जमिनीवर कोसळण्याच्या घटना घडत होत्या. दिवाळीत जखमी झालेल्या आणि श्वासाच्या अडचणी येणाऱ्या पशु पक्षांसाठी रोज 15 ते 16 कॉल येत होते. मात्र यंदा , सर्प आणि पॉज मुंबई या दोन्ही प्राणी मित्र संघटनांना एकाही असा कॉल न आल्याची माहिती संघटनांनी दिली.

अधिक वाचा-  कंगनाच्या अडचणीत वाढ, वांद्रे पोलिसांकडून अभिनेत्रीला तिसऱ्यांदा समन्स

गेल्या वर्षी या संघटनांनी मिळून 70 पशू- पक्षी रेस्कू केले होते. त्यापैकी अनेक पक्षांच्या पंखाना जखमा आढळून आल्या. त्यामुळे महिनाभर रुग्णालयात उपचार करावे लागले. तर काहींना श्वासाचे त्रास झाल्याने उडणेही अशक्य झाले होते. मात्र यंदा सरकारी नियमांमुळे आणि सततच्या जनजागृतीमुळे यंदा ही संख्या पूर्णतः घटल्याची माहिती प्लांट एँड अँनिमल वेलफेअर सोसायटीचे संस्थापक सुनिश कुंजू यांनी दिली.

अधिक वाचा- शिवसेना सरकार हिंदुविरोधी, छटपूजेवरून भाजपची ठाकरे सरकारवर टीका

---------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Animals and birds breathed sigh relief this Diwali reducing number injuries